शहर

हिमायतनगरच्या एस.आय.आर. कॅम्पवरून रणकंदन! बॅनर लावून घरी झोपण्यापेक्षा प्रत्यक्ष मैदानात या; नगरसेविका प्रतिनिधी समद

खान आणि प्रथम नगराध्यक्ष अब्दुल अखिल यांचा विरोधकांवर कडाडून आणि घणाघाती हल्ला!
​हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम): शहरात नगरपंचायतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अत्यंत महत्त्वाच्या एस.आय.आर. (SIR/ESR) कॅम्पवरून राजकीय युद्ध चांगलेच पेटले आहे. या शासकीय उपक्रमाचे फुकटचे श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न करणाऱ्या विरोधकांना नगरसेविका प्रतिनिधी समद खान आणि प्रथम नगराध्यक्ष अब्दुल अखिल यांनी जोरदार चपराक लगावली आहे. “केवळ सोशल मीडियावर खोट्या प्रसिद्धीचे बॅनर लावून घरी झोपण्यापेक्षा, हिंमत असेल तर प्रत्यक्ष मैदानात उतरून जनतेची कामे करा,” अशा अत्यंत कडक शब्दांत त्यांनी विरोधकांना सुनावले आहे.
​६ तारखेच्या बैठकीत झाले होते सर्व नियोजन!
​६ जुलै रोजी हिमायतनगर हायस्कूल येथे स्वतः नगराध्यक्ष, तहसीलदार मॅडम, नगरपंचायत प्रशासन आणि सर्वपक्षीय प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक झाली होती. या बैठकीत ठरल्यानुसारच १६ जुलै रोजी चौपाटी येथील दारुल मोहम्मद येथे या भव्य एस.आय.आर. कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. या नियोजनबद्ध उपक्रमाला नाहक बदनाम करण्याचे राजकारण विरोधकांनी सुरू केल्याचा आरोप नगरसेविका प्रतिनिधी समद खान आणि प्रथम नगराध्यक्ष अब्दुल अखिल यांनी केला.
​तुम्ही कामे केली असती, तर जनतेने तुम्हाला घरी बसवले नसते: प्रथम नगराध्यक्ष अब्दुल अखिल
​या वेळी बोलताना प्रथम नगराध्यक्ष अब्दुल अखिल यांनी विरोधकांचा चांगलाच पंचनामा केला. ते म्हणाले, “जर तुम्ही तुमच्या काळात जनतेची कामे योग्य पद्धतीने केली असती, तर जनतेने आज तुम्हाला घरी बसवले नसते. जनतेने तुम्हाला नाकारले म्हणूनच तुम्हाला आता केवळ बॅनरबाजी आणि राजकारण करण्याची वेळ आली आहे.” ते पुढे म्हणाले की, विरोधकांचे हे बोगस प्रसिद्धीचे राजकारण सुज्ञ नागरिक चांगलेच ओळखून आहेत. विरोधकांनी केवळ अर्धा तास कॅम्पमध्ये येऊन फोटो काढून सोशल मीडियावर प्रसिद्धीचे ढोल वाजवणे बंद करावे आणि काम कसे करावे, हे आमच्या नगरसेवकांकडून शिकून घ्यावे.
​उद्याही कॅम्प सुरूच राहणार; नागरिकांना लाभ घेण्याचे आवाहन
​राजकारण बाजूला ठेवून हा कॅम्प सर्वसामान्य नागरिकांच्या महत्त्वाच्या कामांसाठी लावण्यात आला आहे. उद्या शुक्रवार, १७ जुलै रोजी देखील दारुल मोहम्मद, चौपाटी येथे हा कॅम्प सुरू राहणार आहे. तरी सर्व नागरिकांनी स्वतः उपस्थित राहून आपले फॉर्म भरून घ्यावेत आणि शासकीय कामाची पूर्तता करावी, असे अधिकृत आवाहन नगरसेविका प्रतिनिधी समद खान आणि प्रथम नगराध्यक्ष अब्दुल अखिल यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button