फुलसावंगी येथे रेती तस्करावर खनि कर्म विभागाने केली कारवाई३ ब्रास रेतीचा ट्रिप्पर जप्त

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
येथे आज सकाळी ७ वाजताचे दरम्यान रेती तस्करी करणाऱ्या टिप्परवर कारवाई करून, टिप्पर जप्त करण्यात आला आहे.ही कारवाई जिल्हा खनिकर्म विभागाने केली असून या कारवाईने रेती तस्करांचे धाबे दणाणलेआहे.
महागाव तालुक्याचे शेवटचे टोक असलेलेल्या शिरपुली येथे मागिल अनेक दिवसा पासून रेती तस्करी चालू आहे. परंतू शिरपुली येथील तलाठी, मंडळ अधिकाऱ्याची रेती तस्करावर मेहरनजर असल्याने कोणतीही कारवाई होत नव्हती. येथे सुरु असलेल्या रेती तस्करीची गुप्त माहिती जिल्हा खनिकर्म विभागाला मिळाली. आज सकाळी ७ वाजताचे दरम्यान शिरपुली कडून फुलसावंगी कडे टिप्पर रेती घेवून येत होते. या दरम्यान मेळातील नाल्या जवळ जिल्हा खनिकर्म विभागाच्या पथकाने चोरीची बाळू नेण्याऱ्या टिप्परला सापळा रचुन पकडले.
या कारवाईने महागाव महसुल विभागाचे पित्तळ उघडे पडले आहे. या गंभीर बाबीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.



