Uncategorized

फुलसावंगी शिवारात भांब येथे सहा जुवाऱ्यांनवर कार्यवाही!

महागाव पोलीस स्टेशन अंतर्गत फुलसावंगी येथे अनेक जुगार मटक्याचे काउंटर,महागाव पोलीस अनभिज्ञ कसे?

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे

महागाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अनेक बीट मधून अवैध धंद्याने उच्चांक गाठला आहे. दिनांक 3 7 2025 रोजी फुलसावंगी येथे स्थानिक गुन्हा शाखा पथकाने भांब येथे हनुमान मंदिराच्या पाठीमागील झाडाखाली बावन पत्त्याचा खेळ रंगेहात पकडून सहा आरोपी केले 1 उमेश कैलास पवार 2) गजानन अमृतराव पडागळे 3) शंकर मोहन पवार 4) विजय दत्तराव मैंद 5) प्रफुल मधुकरराव खंदारे 6) इंदल परसराम चव्हाण यां सर्वांना पकडून त्यांचे अंग झळती व मोबाईल किंमत असे मिळून 31 हजार 160 रुपये मुद्देपाल जप्त करण्यात आला ही कारवाई पोलीस कॉन्स्टेबल स्थानिक गुन्हा शाखा रमेश राठोड यांच्या फिर्यादी 363 /2025 कलम 12 (अ)महाराष्ट्र जुगार कायदा प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला परंतु फुलसांगी येथे खुलेआम मटक्याची काउंटर सुरू असून तेथील खावाडावर आज पर्यंत कारवाई करण्यात आली नाही हे कार्यवाही केली. स्थानिक गुन्हे शाखा पुसद पथक महागाव पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात येऊन धाड टाकतात. परंतु महागाव पोलिसांना व बीज जमादार यांना काहीच सुगावा लागत नाही हे जनतेला नवल वाटते आहे.

मागील अनेक दिवसापासून महागाव, फफुलसावंगी, हिवरा, धनोडा ,मुडाणा, गुंज ,पोलीस स्टेशन च्या हद्दीमध्ये अवैध धंद्याने प्रचंड डोके वर काढले आहे. पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्वच बीटमध्ये महागाव पोलिसांच्या आशीर्वादाने मटका क्लब सह गुटखा, गावठी दारू, बनावट देशी दारू विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पुसद पथकाला पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध धंद्याबाबत इत्यंभूच माहिती होते. आणि महागाव पोलीस स्टेशन यंत्रणेला याबाबत काहीच थांगपत्ता लागत नाही. याबाबत सामान्य जनतेचा कुतूहल होत आहे. याचप्रमाणे घारेगाव हद्दीमध्ये जत्रा साखरे यांच्या शेतामधील टिन शेडमध्ये अनेक जुवारी एका बादशाह हा 22 पाणी जुगार खेळताना मंगळवारी स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकत सहा आरोपींना अटक करून 2,67,720 एवढा मुद्देमाल जप्त केला होता. त्याचप्रमाणे मटका घेणारे खावाड यांच्यावर आजपर्यंत कार्यवाही झालेल्या नाही . अतिथी व पत्रकार व राजकीय पुढारी बनले खावाड यांच्यावर स्थानिक गुन्हे शाखा व महागाव पोलीस स्टेशन अधिकारी कारवाई करतील का? लवकरात लवकर महागाव तालुक्यातील अवैध धंदे बंद करावे अशा मागणीला सामान्य नागरिक करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button