Uncategorized

उद्या सर्वपक्षीय सर्व संघटनांकडून शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी महागावात रास्ता रोको आंदोलन


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
मा. बच्चुभाऊ कडू यांच्या नेतृत्वात उद्या दिनांक 24/ 7/ 2025 रोजी महाराष्ट्रभर शेतकरी बांधवांच्या न्याय हक्कासाठी त्यांचा सातबारा कोरा करावा, शेतीमालाला हमीभाव द्यावे, दिव्यांग बांधवांची मानधन सहा हजार रुपये करण्यात यावी, व इतर मागण्यांना घेऊन महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन होणार असून सदर आंदोलनाच्या पार्श्वभूमी महागाव बायपास येथे मातोश्री विद्यालय तुळजापूर नागपूर हायवे रोडवर छत्रपती संभाजी महाराज चौक या ठिकाणी उद्या सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत सर्व संघटना सर्व पक्षाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात ऐणार असून सदर आंदोलनासाठी सर्व पक्षातील, सर्व संघटनेतील कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी या सह जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी दिव्यांग बांधवांनी उपस्थित राहावे हि विनंती. तसेच ठाणेदार यांना निवेदन देण्यात आले त्यावेळेस उपस्थित एडवोकेट पवन धरणकर प्राध्यापक शरदचंद्र डोंगरे डीबी नाईक प्रमोद जाधव गणेश ठाकरे संदीप ठाकरे अमृतराव देशमुख व इतर सर्व कार्यकर्ते यांनी निवेदन दिले

ना कुठल्या पक्षाचा झेंडा फक्त शेतकरी बांधवांचा सातबारा कोरा व्हावा हाच एक अजेंडा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button