शहर

उर्दू बोर्ड हटवल्याने जनक्षोभ: काय हिमायतनगरच्या जनतेची मागणी खासदार लोकसभेत मांडणार?


​हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम): येथील रेल्वे स्टेशनवरून गेल्या अनेक वर्षांपासून असलेला उर्दू भाषेतील नामफलक अचानक हटवण्यात आल्याने प्रवाशांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या विरोधात स्थानिक जागरूक नागरिक शेख अफरोज अ.गणि, डॉक्टर जहुर साहेब आणि अब्दुल अज़ीज़ बाबा यांच्या शिष्टमंडळाने आज थेट रेल्वे प्रशासकीय कार्यालयात अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन सादर केले. या निवेदनाद्वारे आगामी ३० दिवसांत स्टेशनवर उर्दू भाषेतील नामफलक पूर्ववत लावण्याची आग्रही मागणी करण्यात आली आहे.
​संविधानाच्या ८ व्या अनुसूचीनुसार उर्दू ही भारताची अधिकृत भाषा आहे, तसेच रेल्वे वर्कस मॅन्युअल (Paragraph 424) आणि सर्वोच्च न्यायालयाच्या ‘पातूर नगरपरिषद २०२५’ च्या निर्णयानुसार रेल्वे स्टेशनवर उर्दू बोर्ड लावणे पूर्णपणे कायदेशीर व अनिवार्य आहे. तरीही हा बोर्ड हटवून एका विशिष्ट घटकाच्या मूलभूत अधिकारांचे हनन केले जात असल्याचा आरोप या निवेदनातून करण्यात आला आहे.
​खासदार संसदेत आवाज उठवणार का?
या सर्व वादामुळे आता स्थानिक खासदारांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. “भाषा हा कोणत्याही धर्माचा विषय नसून लोकसुविधेचा भाग आहे” हा सर्वोच्च न्यायालयाचा दाखला देत, आता स्थानिक खासदार या जनभावनेची दखल घेऊन लोकसभेत या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणार का? रेल्वे प्रशासनाच्या या मनमानी कारभारावर खासदार संसदेत प्रश्न उपस्थित करून हिमायतनगरच्या जनतेला न्याय मिळवून देणार का? असे प्रश्न आता नागरिक उपस्थित करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button