Uncategorized
ऊस तोडणी यंत्राद्वारे ऊस तोडणी झालेल्या ऊस पिकाच्या नुकसानीची भरपाई द्या

सहसंपादक शेख मुजाहिद
प्रतिनिधी
ऊस तोडण्याकरिता कारखान्याकडून ऊस तोडणी यंत्राचा वापर करण्यात येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या ऊस पिकाचे प्रचंड नुकसान होत असून त्याची भरपाई करण्याची मागणी अर्जाद्वारे करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सुभाष शुगर प्रायव्हेट लिमिटेड हडसनी, ता. हदगाव जि.नांदेड या कारखान्याकडून उमरखेड तालुक्यातील मौजा कोपरा बु. तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ येथील शेत सर्वे नंबर ५/२ अ चे ५ एकर शेतातील ऊस तोडणी करण्याकरिता कारखान्याने ऊस तोडणी यंत्र पाठविले सदर ऊस तोडणी यंत्राच्या सहाय्याने ऊस तोडणी करून गाळपा करिता ऊस पाठविण्यात आला परंतु सदर ऊस तोडणी यंत्राचे चालकाने योग्य रीतीने ऊस तोडणी न करता थातूरमातूर पद्धतीने ऊस तोडणी केल्यामुळे माझ्या शेतातील ऊस पिकाचे प्रचंड नुकसान होत असल्याचे कारखान्यातील कर्मचाऱ्यांना वेळोवेळी सांगितले पण त्यांनी दुर्लक्षित केले असल्याने प्रतिनिधी सोबत बोलतांना सांगीतले व माझ्या कडे बँकेकडून त्याचप्रमाणे उसनवारी कर्ज घेऊन उभ्या केलेल्या ऊस पिकाचे प्रचंड नुकसान झाल्यामुळे मी आता हतबल होऊन प्रचंड आर्थिक अडचणीत सापडले असल्याचे सौ.कांताबाई गणेशराव कदम
(महिला शेतकरी कोपरा बु) यांनी सदर कारखान्यास दिलेल्या अर्जात सांगून कारखान्याने माझ्या ऊस पिकाच्या नुकसानीची नुकसान भरपाई देण्याची विनंती केली आहे.



