Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
Uncategorized

कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या !


Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

उमरखेड व महागाव तालुक्यात यावर्षी अनेक शेतकऱ्यांना बोगस व निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांमुळे दुबार व तिबार पेरणी करावी लागली. त्यामुळे बियाणे, खत, औषधे, मजुरी, ट्रॅक्टर व इतर शेतीच्या खर्चाचा मोठा आर्थिक भार शेतकऱ्यांवर पडला आहे. त्यातच आता पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून
मागील दीड ते दोन महिन्यांपासून पावसाने पूर्णपणे दांडी मारल्याने तालुक्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.
पावसाअभावी शेतातील सोयाबीन, कापूस व इतर खरीप पिके वाळून गेली असून अनेक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे उमरखेड – महागाव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून, भूमिहीनांना काम तसेच कोरडवाहू व बागायतदार शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी आर्थिक मदत देण्याची मागणी रिपब्लिकन सेना व शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे.
उमरखेड – महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असताना शासनाने केवळ कागदोपत्री पाहणी करून वेळकाढूपणा करू नये. शेतकऱ्यांना तातडीने प्रत्यक्ष आर्थिक मदत मिळणे आवश्यक अपेक्षित असून येत्या १५ दिवसांच्या आत शासनाकडून कोरडा दुष्काळ जाहीर आला नसल्यास रिपब्लिकन सेनेच्या नेतृत्वात उमरखेड – महागाव तालुक्यातील शेतकरी वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही प्रशासनास देण्यात आला.
यावेळी यवतमाळ – वाशिम लोकसभा अध्यक्ष सुनिल पाटील चिंचोलकर, संपर्कप्रमुख संतोष ठमके, विधानसभा अध्यक्ष गौतम नवसागरे, उपाध्यक्ष शुद्धोधन दिवेकर, विजय वानखेडे, भीमराव खंदारे, संदीप, राऊत, नंदू इटकरे राजू आगिरे, विनोद इंगोले, राजकुमार खंदारे, सुरेश लोमटे, विशाल बर्डे, विलास नावडे व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.


Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button