नॅचरल शुगर कारखान्याचा ऊस दर फक्त ₹2700; शेतकरी संतप्त — ₹3300 दराची मागणी तीव्र

महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
नॅचरल शुगर लिमिटेड युनिट क्र. 2 यांनी या हंगामातील गाळप हंगामात आत्तापर्यंत 1 लाख 40 हजार टन ऊसाचे गाळप पूर्ण केले आहे. परंतु कारखान्याने ₹3300 प्रति टन दर न देताच केवळ ₹2700 प्रति टन दराने ऊसाचा हप्ता देण्यास 2 डिसेंबर 2025 रोजी प्रारंभ केला. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी संतापले आहेत.
शेतकऱ्यांनी याआधीच घोषणांद्वारे कारखान्याकडे ₹3300 ऊस दर देण्याची मागणी केली होती. सोलापूर, कोल्हापूर आदी ऊस पट्टयातील कारखान्यांकडून ₹3300 ते ₹3500 पर्यंत भाव दिला जात असताना नॅचरल शुगर कारखान्याचा केवळ ₹2700 दर शेतकऱ्यांना धोरणात्मक अन्यायकारक असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
शेतकऱ्यांनी सांगितले की,
“बाजारभाव उच्च असूनही नॅशनल शुगर कमी दर देत आहे. आम्ही कारखाना प्रशासन व राज्य शासनाकडे ₹3300 ऊस भाव लगेच जाहीर करण्याची मागणी करत आहोत.”
दरम्यान, शेतकऱ्यांचा असंतोष वाढत असून पुढील काही दिवसांत तीव्र आंदोलनाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.



