भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या महागाव शहर अध्यक्षपदी शैलेश कोपरकर यांची नियुक्ती ; संघटन बळकट करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय …

महागाव :
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या शिफारशीवरून तसेच जिल्हा काँग्रेस कमिटी, यवतमाळचे अध्यक्ष ॲड. सचिन नाईक यांच्या नेतृत्वाखाली महागाव शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी नगरसेवक तथा गटनेता शैलेश कोपरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे . त्यांच्या नियुक्तीचे महागाव शहरासह तालुकाभरातील काँग्रेस पदाधिकारी , कार्यकर्ते आणि नागरिकांनी स्वागत केले असून , या निवडीमुळे शहरातील काँग्रेस संघटनेला नवी ऊर्जा व बळकटी मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे .
शैलेश कोपरकर यांनी नगरसेवक म्हणून कार्य करत असताना महागाव नगरपंचायतीमध्ये काँग्रेसची सत्ता स्थापन करण्यात मोलाची भूमिका बजावली . त्यांच्या कार्यकाळात शहरात कोट्यवधी रुपयांची विकासकामे मार्गी लागली. विविध मूलभूत सुविधा, नागरिकांच्या प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा तसेच विकासाभिमुख भूमिका यामुळे त्यांनी जनतेचा विश्वास संपादन केला.
सामान्य नागरिकांच्या न्यायहक्कांसाठी त्यांनी अनेक लोकआंदोलने उभारली. प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आवास योजना आणि रमाई आवास योजनेंतर्गत शेकडो गरजू कुटुंबांना घरकुलाचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. तसेच निराधार, दिव्यांग, विधवा, ज्येष्ठ नागरिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनाकडे प्रभावी पाठपुरावा केला.
त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर महागाव शहर काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे.
या नियुक्तीमुळे शहरातील काँग्रेस संघटना अधिक सक्षम होईल, युवक, महिला आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणावर पक्षाशी जोडले जातील तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची विचारधारा आणि जनहिताची धोरणे तळागाळापर्यंत पोहोचविण्यास निश्चितच गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
शैलेश कोपरकर यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, जिल्हाध्यक्ष ॲड. सचिन नाईक यांच्यासह काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
या निवडीचे श्रेय काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे , माजी मंत्री शिवाजीराव मोघे , महिला प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे , माजी मंत्री वसंतराव पूरके, आमदार बाळासाहेब मांगुळकर , माजी जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल मानकर , काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा महागाव तालुका जिनिंग प्रेसिंग चे अध्यक्ष संभाजीराव दादा नरवाडे , महिला जिल्हाध्यक्ष वंदनाताई आवारी ,
उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे नेते तातू देशमुख , यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी सभापती राम देवसरकर , अल्पसंख्यांक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार वजाहत मिर्झा , काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस डॉ . मोहम्मद नदीम , काँग्रेसचे युवा नेते गोपाल अग्रवाल , काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या वनमालाताई राठोड , ज्येष्ठ नेते नंदकिशोर अग्रवाल , काँग्रेसचे नेते माजी तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख , उमरखेड तालुकाध्यक्ष दत्तराव शिंदे , अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र कावळे , माजी तालुकाध्यक्ष डॉ . अरुण पाटील , महागाव पंचायत समितीचे माजी उपसभापती बाळासाहेब देशमुख लेवेकर , तालुक्याचे युवा नेतृत्व प्रमोद जाधव , वसंतराव भुसेवाड , अनिल पाटील कदम , प्रेमराव वानखेडे , स्वप्निल नाईक , पुंडलिकराव भुरके , कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती बाळासाहेब करपे , तालुका खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष विठ्ठलराव पवार , नागोराव वराडे , युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष इम्रान पठाण , महिला अध्यक्ष मालाताई देशमुख , शहराध्यक्षा सीमाताई नरवाडे , सुनील भवानकर , शेख जावेद , महागाव तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक सुनील भरवाडे , रुग्ण कल्याण समितीचे सदस्य अतुल दादा शिंदे ,
बाळासाहेब येणकर , कुणाल नाईक , युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे सचिव भगवानराव पडागळे , आदींना देत आहेत .



