शहर

अन्न व औषध प्रशासनाच्या नावावर महागाव तालुक्यात वसुली; भेसळीमुळे ग्राहकांच्या आरोग्यास धोका

महागाव प्रतिनिधी: संजय नागरगोजे
महागाव: अन्न व औषध प्रशासन (FDA) तसेच पत्रकारांच्या नावाखाली महागाव तालुक्यातील किराणा दुकानदारांकडून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर वसुली करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप होत आहे. फुलसांगी, हिवरा काळी, दौलतखान आणि गुज सावना यांसह अनेक गावांमध्ये ही वसुली सुरू आहे.
या वसुलीमुळे तालुक्यात भेसळीला आणि डुप्लिकेट (नक्कल) वस्तूंच्या विक्रीला खुलेआम प्रोत्साहन मिळत आहे. अनेक व्यापारी भेसळयुक्त चटण्या, मसाले, तेल, मिठाई आणि निकृष्ट दैनंदिन वस्तू विकून नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहेत. स्टेशनरीमध्ये ब्रँडेड कंपन्यांचे डुप्लिकेट साबण, शाम्पू आणि सौंदर्य प्रसाधने विकली जात आहेत, तर मेडिकल स्टोअर्समध्ये “मुंबई मार्केट” च्या गोळ्या उपलब्ध आहेत.
एका विशिष्ट व्यापाऱ्याने वसुली केलेली रक्कम अन्न व औषध प्रशासन विभागातील संबंधितांना मिळत असल्याने तपासणीला थारा नाही, अशी चर्चा आहे. या निष्क्रियतेमुळे ग्राहकांची प्रचंड फसवणूक होत आहे.
मागणी: नागरिकांनी जिल्हा अन्न व औषध प्रशासन विभागाने या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button