हिमायतनगरमध्ये श्री गणपती विसर्जन मिरवणुकीत महावितरणचे विघ्न; शांतता कमिटीच्या आवाहनाला हरताळ फाळत वीज गायब केल्याने नागरिकांचा तीव्र संताप!

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
हिमायतनगर | शुक्रवार, २५ सप्टेंबर २०२६ | तालुका हिमायतनगर ( तालुका प्रतिनिधी: शेख खय्यूम)
आज हिमायत नगर शहरात मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात गणपती बाप्पाला निरोप दिला जात असतानाच महावितरणच्या घोर दुर्लक्षामुळे मोठे विघ्न निर्माण झाले. विसर्जन शांततेत पार पडावे यासाठी पोलीस ठाण्यात आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत गणपती विसर्जन मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि नागरिक यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना बारंवार विनंती केली होती. मात्र, सण-उत्सवाच्या काळात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याच्या नियमांना हरताळ फाळत ऐन विसर्जन मिरवणुकीच्या वेळीच वायरमनने वीज पुरवठा खंडित केला आणि संपूर्ण शहर अंधारात लोटले. सण आणि सार्वजनिक उत्सवांच्या वेळी वीज वितरण यंत्रणेने विशेष दक्षता घेणे नियमानुसार आवश्यक असतानाही, महावितरणच्या या बेजबाबदार धोरणामुळे गणेशभक्त व नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802



