बाबासाहेब नाईक सूतगिरणी भ्रष्टाचाराच्या विळखेळ्यात !

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यात बाबासाहेब नाईक सह . सुतगिरणी पिंपळगांव येथे स्थापन करण्यात आली. महागाव परिसरात व पुसद परिसरातील सुशिक्षित लोकांना काम मिळाले अशा उद्देशाने ही सूतगिरणी संस्था सुरू करण्यात आली.परंतु मागील काळात भ्रष्टाचारामुळे त्या सूतगिरणीला घरघर निर्माण झाली त्यामुळे मुळे त्या संस्थेतील काही युनिट दुसऱ्या कंपनीला भाड्याने द्यावी लागली. आम सभेमध्ये वेळोवेळी याबाबत भ्रष्टाचार च्या गाथा ऐकायला मिळाल्या परंतु त्यावर नियोजन मात्र कोणी केले नाही. सभासद आमसभेला चहा व नाश्ता करू निघून जायचे, एक दोन सभासद बोलत होते. त्यावेळेस कोणत्याही सभासदाने त्यांना सहकार्य केले नाही .ज्यावेळेस संस्था नफ्यात होती त्यावेळी टक्क्याच्या नादात अध्यक्षांनी व संचालकांनी ठराव घेऊन नफ्याचे पैसे दुसऱ्या जिल्ह्यातील बुडीत बँकेत ठेवी ठेवल्यामुळे सतरा कोटीचा घाटा झाला. त्या ठेवीवरील व्याज बुडाले त्याला जबाबदार कोण ? असा प्रश्न प्रत्येक आमसभेत करण्यात आला. सूतगिरणी मधील अर्धे युनिट बंद आहे. त्यामुळे घाटा येत आहे .अशा वेळेस असे कळते की अध्यक्ष व महागांव / पुसद संचालकांना पुसद येथे जेष्ठ नेते मनोहराव नाईक यांचा तातडीच्या बैठकीसाठी निरोप दि. १५ / १० / २०२५ रोजी अध्यक्ष/ अपाध्यक्ष यांच्या कामकाजावर चर्चा होण्याची शक्यता आहे . अध्यक्ष शाम पाटील संचालकांना सहकार्य करीत नसल्याचा बहुतांश संचालकांचा आरोप असल्यामुळे उपाध्यक्ष ययाती नाईक यांचा राजीनामा होण्याची शक्यता ? त्यामुळे भविष्यात अध्यक्ष उपाध्यक्ष कोण होणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



