सवना सेंट्रल बँकेचा महाप्रताप शेतकऱ्याचे पी एम किसान अनुदान कर्ज खात्यात जमा

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यात सवना येथे सेंट्रल
बँक असून वाकुडी येथील शेतकरी बाबुराव भगाजी सुरोशे या शेतकऱ्याचे पीएम किसान योजनेअंतर्गत बँक खात्यात दोन हजार रुपये जमा झाले होते. ते काढायला गेले असता त्यांचे पैसे कर्ज खात्यात जमा झाले असे बँक मॅनेजर यांनी सांगितल्यामुळे त्यांनी एडवोकेट गजेंद्र देशमुख सामाजिक कार्यकर्ते यांना सांगितले त्यांनी लगेच इतर शेतकरी यांनी महागाव तहसील मध्ये येऊन लेखी तक्रार दाखल केली. एडवोकेट गजेंद्र देशमुख यांनी इतरही अजून काही शेतकऱ्याचे अतिवृष्टीचे अनुदान पीक कर्ज खात्यात जमा केल्याचे सांगण्यात आले .त्यामुळे त्यांच्या बोलण्याची व अर्जाची दखल घेऊन रोहित शिंदे परिविक्षाधिन तहसीलदार महागाव यांनी सेंट्रल बँक मॅनेजर यांना फोन करून तात्काळ शेतकऱ्याचे अनुदान व पी एम किसान किसान अंतर्गत येणारे अनुदान कर्ज खात्यात जमा करू नका असे जिल्हाधिकारी यांचे मार्गदर्शक मीटिंगमध्ये केले आहे . पी एम किसान योजनेचे व अतिवृष्टी चे पैसे शेतकऱ्याला द्या असे सांगण्यात आले. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांचे समाधान झाले.



