सीआयएसएफ जवान राजुसिंग आलूसिंग चव्हाण यांचे अल्पशा आजाराने निधन

शेख मुजाहिद सह-संस्थापक
उमरखेड तालुक्यातील अमानपूर या गावातील सीआयएसएफ जवान राजूसिंग आलूसिंग चव्हाण यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
उमरखेड तालुक्यातील अमानपूर या गावातील आलूसिंग थावरा चव्हाण (माजी सैनिक) यांचा मुलगा राजूसिंग या युवकाने आपल्या वडिलांकडून देशसेवेची प्रेरणा घेऊन प्रचंड मेहनत घेऊन केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सीआयएसएफ) या बलामध्ये सप्टेंबर २००६ यावर्षी भरती होऊन विविध ठिकाणी उत्कृष्ट सेवा बजावली. मागील काही दिवसांपासून त्यांची शारीरिक प्रकृती बिघडली असल्यामुळे उपचार घेऊन ते वैद्यकीय रजेवर गावी आले असता रविवार दिनांक २१ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी त्यांना देवाज्ञा झाल्याने अमानपूर गावासह परिसरात शोककळा पसरली. राजू सिंग यांचे पश्चात त्यांची पत्नी,आई,पाच बहिणी व दोन भाऊ यांचे वर तर दुःखांचा डोंगरच कोसळला. अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे राजूसिंग प्रत्येकाशी प्रेमाने वागत असत रजेवर आले असता प्रत्येक अबाल वृद्धांची खुशाली विचारत असत त्यामुळे ते सर्वांचे चाहते होते असे गावकऱ्यांच्या चर्चेतून ऐकावयास मिळाले. दिनांक २२ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९:०० वाजता अंतयात्रा निघाली यावेळी देशभक्तीपर गीतांनी आणि भारत माता की जय, अमर रहे अमर रहे राजूसिंग अमर रहे या घोषवाक्यांनी देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले होते त्यांचे पार्थिवावर शासकीय इतमामात सलामी देऊन अत्यंत शोकाकुल अवस्थेमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. राजूसिंग यांच्या अचानक निघून जाण्याने चव्हाण परिवारामध्ये खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे. राजूसिंग यांचे स्वप्न होते की आपल्या गावातील प्रत्येक तरुणाने देश सेवा करण्यासाठी सैन्य दलात भरती व्हावे त्यांच्या इच्छेप्रमाणे गावातील तरुण वर्गाने सैन्य दलात भरती होऊन देश सेवा करण्याचा संकल्प प्रतिनिधी जवळ बोलून व्यक्त केला. सीआयएसएफचे अधिकारी यांनी भारत देशाची आन-बान शान असलेला तिरंगा ध्वज राजूसिंग यांच्या पत्नीकडे सुपूर्त करतेवेळी जमलेल्या समुदायाच्या डोळ्यातून अश्रुधारांचा बांध फुटला
—————————–
“जब तक सुरज चांद रहेगा राजू सिंग तेरा नाम रहेगा/”
“अमर रहे अमर रहे राजू सिंग अमर रहे”
—————————–
राजू सिंग हा सप्टेंबर २००६ मध्ये केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलात दाखल झाला २० वर्षे सेवा करून २१ सप्टेंबर २०२५ रोजी तो आम्हास सोडून गेला असे भाऊ उद्गार त्यांचे मोठे बंधू विजयसिंह चव्हाण यांनी प्रतिनिधी जवळ बोलताना व्यक्त केले.



