Uncategorized

महागावात तालुक्यात प्रशासनाच्या ढिसाळ कारणामुळे शेतकऱ्याच्या आत्महत्याचे सत्र सुरू!

(भारतीय जनता पार्टीचे आमदार किसान वानखडे यांना आपल्या मतदारसंघात होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या ची विसर )

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे

महागाव तालुक्यात दहिसावळी येथे दिनांक 21 9 2025 रोजी विपुल घोरपडे या शेतकऱ्याने आत्महत्या केली होती शेत पिकाची अतोनात नुकसान झाल्यामुळे शेताचे पंचनामे न केल्यामुळे ही घटना ताजी असताना दिनांक 24 सप्टेंबर पुन्हा दहिसावळी येथे नामदेव बाबाराव बावणे या शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली त्याच्या कुटुंबात अल्पभूधारक शेती होती बँकेचे कर्ज होते.अतिवृष्टीमुळे संपूर्ण शेती खरडून गेली होती बँकेचे कर्ज कसे फेडायचे या चिंतेमध्ये असल्यामुळे व यापूर्वी 21 तारखेला विपुल घोरपडे या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती त्यावेळेस तहसीलदार अभय मस्के यांनी त्यांच्या घरी साधी भेट देऊन सात्वन केले असते व गावांमध्ये सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले असते तर अशी वेळ येत नव्हती प्रशासन मधील कोणतेही अधिकारी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या येथे साधी व्हिजिट सुद्धा देत नाहीत ही मोठी शोकांतिका आहे कृषी अधिकारी असो तहसीलदार पटवारी मंडलाधिकारी यांनी गावामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे व अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना सहानुभूती देऊन सातवंत करणे गरजेचे असताना साधे मार्गदर्शन करायला कोणी तयार नाही आमदार बघायच्या भूमिकेत आहेत आमदाराची आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या येथे कोणत्याही सहानुभूती किंवा सातवंत भेट सुद्धा नाही ही मोठी शोकांतिका आहे. महागाव तालुक्यात शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याची चित्र पहायला मिळत आहे जिल्हा अधिकारी यांनी या प्रकरणाची दखल घेऊन जनता दरबार महागाव येथे लावावा व सर्व शेतकऱ्यांच्या काय समस्या हे जाणून घ्याव्या लोकप्रतिनिधी झोपेत असल्यामुळे व निसर्गाची साथ नसल्यामुळे शेतकरी फार मोठ्या अडचणीत आला आहे. त्यांना या कठीण समस्या पासून दूर कसे करता येईल याच्या उपाययोजना करून विविध योजना शेतकऱ्यांना महागाव तालुक्यात कशा देता येईल हे उपाययोजना करण्याकरता सर्व प्रशासकीय अधिकारी लोकप्रतिनिधी यांचा व शेतकरी यांचा जनता दरबार घेऊन शेतकऱ्यांच्या समस्या तात्काळ सोडाव्या नाहीतर अशा घटना वाढत चालले आहे. दोन वर्षात 85 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहे. तरी प्रशासनाला जाग आली नाही त्यामध्ये 40 शेतकऱ्यांच्या आत्महत्या ग्रस्त कुटुंबाला मदत देण्यात आली बाकी प्रकरन धूळ खात आहे. त्याला प्रशासन अधिकारी तहसीलदार हा सर्वस्वी जबाबदार असल्याचे चर्चा सुज्ञ व बुद्धिवान नागरिकांमध्ये सुरू आहे.याबाबत आमच्या प्रतिनिधींनी यापूर्वीच आत्महत्या होत असल्याबाबत चिंतन करण्याचे वृत्त प्रकाशित केले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button