शहर
टेंभी येथे प्रेम प्रकरणात दोघाची गळफास घेऊन आत्महत्या

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यात दीनांक-18-9-2025 रोजी टेंभी येथे कु. नंदनी विजय धोत्रे वय 15 वर्षे व सचिन कैलास पवार या दोघांनी धोत्रे यांच्या घरामध्ये टीन पत्राच्या वरच्या लाकडाला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही आत्महत्या प्रेम संबंधातून झाल्याची घटनास्थळी माहिती मिळाली अशी तक्रार रमेश दिगंबर धोत्रे यांनी महागाव पोलीस स्टेशनला एक वाजता च्या दरम्यान जबानी रिपोर्ट द्वारे दिली आहे .त्या तक्रारीची दखल घेऊन ठाणेदार धनराज निळे यांनी तात्काळ घटनास्थळी पीएसआय कायंदे यांना पाठवून घटनास्थळीचा पंचनामा करून दोघांच्याही डेड बॉडी लटकलेल्या अवस्थेत असलेल्या आढळून आल्या त्या खाली उतरून घटनास्थळीचा पंचनामा करून पी.एम.साठी पाठवण्यात आल्या पुढील तपास ठाणेदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय कायंदे करीत आहे.



