Uncategorized

हिवरा येथे कीटक सर्वेक्षण राबवून जनजागृती करण्यात आली


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे

आज दिनांक 04/09/2025 रोजी वैद्यकीय अधिकारी, प्रा. आ. केंद्र. पोहंडुळ यांच्या आदेशानुसार व आरोग्य सहाय्यक यांच्या मार्गदर्शनाखाली उपकेंद्र हिवरा येथे कीटक शास्त्रीय सर्वेक्षण व जलद ताप सर्वेक्षण” करण्यात आले… कंटेनर सर्वेक्षण करून दूषित भांडे रिकामे करण्यात आले व काही दूषित भांड्यात टेमिफॉस द्रावण टाकण्यात आले… नागरिकांना कीटकजन्य रोग व साथरोग बाबत आरोग्य शिक्षण देण्यात आले… नागरिकांना आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन करून परिसरात असलेल्या कुंड्या व इतर टाकाऊ वस्तु मध्ये पाणी साचू नये याबाबत दक्षता घेण्यास सांगण्यात आले व परिसर स्वच्छतेचे महत्त्व सांगण्यात आले … साथरोग नियंत्रण संदर्भात माहिती देऊन पाणी स्त्रोतांचे ओटी टेस्ट घेण्यात आले… तापाच्या रुग्णांना औषधोपचार करून त्यांचे रक्त नमुने घेण्यात आले….*
उपस्थित आरोग्य टीम
ए. एस. पुंडे ( एम पी डब्ल्यू )
उपकेंद्र हिवरा सर्व आशाताई

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button