Uncategorized

शेतकऱ्यांनी ‘कपास किसान’ ॲप द्वारे घरबसल्या कापूस विक्री व्यवहार निश्चित करता येणार !

एक सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत शेतकऱ्यांनी ॲप डाऊनलोड करुन कापूस विक्री नोंदणी करण्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे आव्हान!

महागांव, प्रतिनिधी संजय नागरगोजे

महागाव तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आता घरबसल्या आपल्या मोबाईल ॲप द्वारे कापूस विक्री कधी करावी याबाबत नोंद करता येणार आहे. याबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीने सांगितले, शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईल मध्ये कापूस विक्रीच्या व्यवहारासाठीॲप घेऊन आता आपल्या कापसाची विक्रीसाठी नोंद करण्यात येणार आहे. प्रसंगी काही अडचण आल्यास तात्काळ बाजार समिती प्रशासनाचे सहकार्य घ्यावे असे आव्हान कृषी उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष, संचालक मंडळांनी केले आहे.

भारतीय कापूस निगम लिमिटेड सीसीआय द्वारे नजीकच्या काळात महागाव तालुक्यांत शासकीय हमी भावाने कापूस खरेदी सुरू होणार आहे. त्या साठी 01 सप्टेंबर 2025 ते 30 सप्टेंबर 2025 या कालावधीत ‘कपास किसान’ या मोबाईल ॲपद्वारे आपले नाव नोंदविण्यासाठी प्रक्रिया पूर्ण करून घेणे आवश्यक आहे. आपण घरबसल्या आपला कापूस कधी विक्री करणार आहात, या साठी आपले नाव नोंदणी करून घ्यावे असे आव्हान कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळाने नुकतेच कळवले आहे.भारतीय कापूस निगम ली द्वारे नजीकच्या काळात महागाव तालुक्यात शासकीय हमीभावाने कापूस खरेदी सुरू होणार आहे. त्या करीता 01 सप्टेंबर 2025 ते 30 सप्टेंबर 2025 या कालावधीत सर्व शेतकऱ्यांनी ‘कपास किसान’ या ॲपद्वारे मोबाईलवर आपले नाव नोंदणी करण्यासाठी आवाहन केले. त्यासाठी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. या मध्ये सर्वप्रथम आपल्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये प्ले स्टोअर द्वारे आपण ‘कपास किसान’ॲप डाऊनलोड करावे. आपला मोबाईल क्रमांक नोंदवून झाल्यानंतर ओटीपी द्वारे लॉग इन करावे. त्यानंतर नाव नोंदणी रजिस्ट्रेशन करावे. त्यामध्ये आपले नाव आधार कार्ड प्रमाणे लिंग जन्मतारीख, प्रवर्ग, आधार क्रमांक, पत्ता व इतर आवश्यक माहिती भरायची आहे. नोंदणी करतांना आपले आधार कार्ड जमिनी बाबतचे दाखले गाव नमुना सातबारा उतारा 2025/2026 या वर्षा करिता कापसाचा पेरा नोंद असलेले, बँक पासबुकचे पहिल्या पानाचा स्पष्ट स्वतःचा फोटो काढावा लागतो. ही प्रक्रिया पूर्ण करावी इतर आवश्यक माहिती भरल्यानंतर सबमिट रजिस्ट्रेशन हे बटन दाबून प्रक्रिया पूर्ण करावी. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नोंदणी यशस्वी पूर्ण झाल्याचा संदेश येईल, म्हणजे नोंदणी प्रक्रिया झाली आहे. यानंतर आपण आपले इतर जमिनीचा तपशील वाढीव क्षेत्र या ऑप्शनद्वारे ऍड करू शकता किंवा वाढवू शकता. राज्य शासनाकडून पडताळणी झाल्यानंतर आपल्याला संदेश येईल. त्यानंतर तुम्ही प्रत्यक्ष कापूस केव्हा विक्रीसाठी आणायचा ती तारीख व वेळ याच ॲप मधील बुक स्टॉल द्वारे निश्चित करू शकता. तुम्ही निश्चित केलेल्या तारखेला, वेळेला कापूस विक्रीसाठी आणावा. जर तुम्हाला काही अडचण आल्यास तारीख व वेळ यामध्ये तुम्ही फक्त दोन वेळा दुरुस्ती करू शकाल. या साठी सर्व कापूस उत्पादक शेतकरी बंधू भगिनींना सूचना करण्यात आल्या. शेतकऱ्यांनी सूचने नुसार आपण घरबसल्या आपला कापूस विक्रीसाठी 01 सप्टेंबर 2025 ते 30 सप्टेंब 2025 या कालावधीमध्ये आपले नाव नोंदणी करून घ्यावी. या संदर्भात काही अडचण आल्यास सकाळी 11 ते सायंकाळी 5 या कार्यालयीन वेळेत कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयासी संपर्क करावा असे आव्हान कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष गुलाबराव जाधव आणि चालक मंडळांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button