Uncategorized

मराठा आरक्षणासाठी रस्ता रोको केल्यामुळे गुन्हा दाखल

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे

मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता मनोज दादा जरांगे पाटील यांनी मुंबई येथे उपोषण करून सर्व महाराष्ट्राचे लक्ष वेधले होते आणि त्यांना साथ देत महाराष्ट्रातला समस्त मराठा समाज हा मुंबईमध्ये दाखल झाला होता.
त्यांच्याच समर्थनात 1/9/2025 सोमवार रोजी महागाव येथे तालुक्यातील मराठा बांधवांनी नागपूर तुळजापूर महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केले होते यात तालुक्यातील समस्त मराठा बांधव सह इतर समाज बांधव सुद्धा उपस्थित होते मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता या आंदोलनात फुलसावंगी येथील मुस्लिम कार्यकर्तेनीं सुद्धा त्यांची उपस्थिती दर्शवली होती या आंदोलनामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात मुस्लिम समाज हा मराठा समाज यांच्या सोबत उभा राहतांना दिसला ज्या पद्धतीने मदत करता येईल त्या पद्धतीने मुस्लिम बांधवानी मदत केली. आणि याच अनुषंगाने एक खारीचा वाटा म्हणून मुस्लिम बांधवानी यांनी सुद्धा मराठा बांधवांसह महागाव येथे रस्ता रोको आंदोलन केले.आणि यात रस्ता रोको आंदोलनात मराठा बांधवासह मुस्लिम बांधवावर सुद्धा यांच्यावर ही गुन्हा दाखल झाला.
शैलेश कोपरकर,शिवाजीराव देशमुख, उदय नरवाडे,नितीन नरवाडे, अमर नरवाडे, शिवाजी नरवाडे, तेजस नरवाडे, सुरेश देशमुख, विशाल पवार, संदीप ठाकरे, आशिष देशमुख, गोविंदराव देशमुख, हंसराज मोरे, समाधान राऊत, नितीन नरवाडे,अमोल नरवाडे, स्वप्निल अडकिने, प्रवीण ठाकरे, गोलू नरवाडे, प्रवीण नरवाडे, बबनराव गावंडे, राहुल वानखेडे, अविनाश नरवाडे,पंकज देशमुख, आणि गजानन देशमुख, तर यामध्ये आवर्जून एक नाव दिसत आहे ते म्हणजे फुलसावंगी येथील मुस्लिम बांधव कयाम भाई नवाब यांचे हे मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी आंदोलनामध्ये सहभागी झाले त्यांच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button