Uncategorized

उमरखेड एस. डी. ओ. कार्यालयाच्या आदेशाला महागाव तहसील प्रशासनाची केराची टोपली? -विधवा शेतकरी महिला शेत रस्ता खुला करून मिळण्यासाठी विवंचनेत.

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे

महागाव तालुक्यातील माळकिन्ही येथील विधवा महिला शेतकरी सीमा संतोष लहाने यांचा शेत रस्ता अडवल्यामुळे त्यांच्या शेतातील चार एकर तुरीची गंजी पडून राहिली. या विरोधात त्यांनी महागाव तहसील प्रशासनाला 3 फेब्रुवारी 2025 ला पहिला अर्ज दिला.त्यावर सुनवाई देखील झाली आणि सीमा संतोष लहाने यांच्या बाजूने आदेश देखील आला.परंतु त्या आदेशावर स्टे आल्यानंतर हे प्रकरण उमरखेड येथील एसडीओ कार्यालयाकडे गेले.एसडीओ कार्यालयामध्ये सुद्धा सीमा संतोष लहाने यांची न्याय्य बाजू समोर आल्यानंतर एसडीओ कार्यालयाने देखील त्यांच्या बाजूने 4 ऑगस्ट 2025 रोजी रस्ता खुला करून देण्याचा आदेश दिला.

ह्या आदेशाला 25 दिवस उलटून गेल्यावर देखील महागाव तहसील प्रशासन अंमलबजावणी न करून एका विधवा महिला शेतकऱ्याचा अंत पाहत आहे की काय? हा प्रश्न निर्माण झाला असून सदर महिला शेतकऱ्यावर लहान मुलांसह उपासमारीची वेळ आली आहे..तसेच महागाव तहसील प्रशासनान एस डी ओ कार्यालयाच्या आदेशाला केराची टोपली का दाखवित आहे? असा सवाल आता निर्माण होत आहे.
तात्काळ ह्या संदर्भात न्याय मिळावा ह्यासाठी आज यवतमाळ येथे लोकशाही दिनानिमित्त सीमा संतोष लहाने यांच्यासह भारत मुक्ती मोर्चा चे विद्वान केवटे यांनी यवतमाळ जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले.
यावेळी शुभम खंदारे,अनिल लहाने,मुनव्वर खान, जयशील कांबळे,समाधान पंडागळे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button