आमदार वानखेडे : नैसर्गिक संकटाला कृत्रीम संकट करणाऱ्या अधिकाऱ्यांवर बरसले एकही आपादग्रस्त, नुकसानग्रस्त सर्वेतून सोडू नका

शेख मुजाहिद ससंपादक मो 7798306192
उमरखेड:- तालुक्यात १५ ऑगस्टपासून झालेल्या ढगफुटी सदृश कोसळलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. त्यासोबतच या नैसर्गीक आपत्तीला कृत्रीमरित्या शेतकर्यावर संकट ढकलणाऱ्या नॅशनल हायवे च्या अधिकाऱ्यांना आमदार किसनराव वानखेडे, भाजपा जिल्हा समन्वयक नितिन भुतडा यांनी शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसानीला जबाबदार धरीत धारेवर धरले. नॅशनल हायवेचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात घुसविल्याचा आरोप करून कृत्रीमरित्या संकट ओढवून आणल्याबद्दल संबंधितांवर आमदार वानखेडे चांगलेच बरसले उमरखेड महागाव विधानसभा मतदार संघात १५ ऑगष्ट पासून आजतायत संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. मतदार संघातील जवळपास १ लाख हेक्टर शेत पिकांचे अतोनात नुकसान झाले तर अनेक घरे उद्धवस्त झालीत या नैसर्गिक व कृत्रिम आपत्ती कशी ओढावली व येणाऱ्या संकटाला टाळण्याच्या हेतूने आज दि. 19 ऑगस्ट रोजी स्थानिक राजे संभाजी उद्यानात विधानसभेतील संबंधीत सर्व विभागातील अधिकारी समवेत घेतलेल्या आढावा बैठकीत आमदार किसनराव वानखेडे, भाजपा नेते नितिन भुतडा हे बोलत होते झालेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे नॅशनल हायवेच्या अधिकार्यांनी कोसळलेल्या पाण्यामुळे नॅशनल हायवेवरही नदिचे स्वरूप प्राप्त झाले होते. पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी कोणतीही उपाय योजना न करणाऱ्या नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांमुळे तब्बल १० तास हायवे रस्ता बंद होता तर रस्त्यावरही खड्डे निर्माण तर झालेच मात्र नॅशनल हायवेच्या अधिकायांनी झालेल्या अतिवृष्टीत नैशनल हायवे वरून पाण्याचा प्रवाह तिव्र गतीने वाहत असतांना ते पाणी शेतकर्यांच्या शेतात सोडून कृत्रीमरित्या संकट निर्माण केले त्यामुळे कुणाच्याही शेतात तुम्ही पाणी कसे सोडू शकता म्हणून अधिकाऱ्यांना खडसावले तसेच रस्त्याच्या कडेवरील नाल्या हे प्रत्यक्ष संबंधीत अभियंता पाहून करतील अन्यथा आमच्या पाहणीत दोषी आढळल्यास संबंधीत अधिकाऱ्यांची जिम्मेदारी राहणार असून शेतकर्यांचे नॅशनल हायवे च्या कृत्रीम रित्या पुरामुळे नुकसान झाले ते हायवे प्रशासन भरून देणार का ? असा प्रश्न यावेळी नितिन भुतडा यांनी उपस्थित केला.
यावेळी मंजूर असलेल्या मात्र अद्यापही सुरुवात न करणाऱ्या पुसद हरदडा रस्ता ठेकेदाराला धारेवर धरीत सध्याच्या रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने १५ ऑगष्ट रोजी व त्याअगोदर आंदोलन झाल्याने सर्वकाही मंजूरात असतांनाही कामाला सुरुवात न केल्याने संबंधीत कंत्राटदार संजय मनावरे यांना धारेवर धरीत समज देण्यात आली. यावेळी महसूल विभागांच्या अधिकाऱ्यांना नुकसानग्रस्त भागाची पाहणी करुन एकही आपादग्रस्त नुकसानी ग्रस्त यादीतून ( सर्वेतून सुटला नाही पाहिजे यासाठी प्रयत्न करा व जे अधिकारी अतिवृष्टी सारख्या संकटात कामे करणार नाहीत त्यांची इन्क्रीमेंट बंद करा असे निर्देश आमदार किसनराव वानखेडे यांनी दिले तर या अतिवृष्टीत मतदार संघात ज्या लहान लहान पुलांमुळे मार्ग बंद पडले तसेच जिथे पुलाची आवश्यकता आहे तिथे पुलाचे आराखडे तयार करून पुल निर्माती करण्याच्या सुचना सार्वजनिक बांधकाम विभाग व जिप बांधकाम विभाग अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत या अतिवृष्टीत मदतीच्या नावाखाली व इतरही कुठल्पा कामाबाबत जनतेची पिळवणूक करणाऱ्या कर्मचार्यावर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले आहे . या आढावा बैठकीला माजी आमदार नामदेव ससाने भाजयुमो जिल्हा अध्यक्ष रोहित वर्मा दत्तदिगंबर वानखेडे उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे उपस्थित होते



