Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
Uncategorized

एसटी आरक्षणामुळे नेतेमंडळींच्या पोटात गोळा!
सुधाकर नगर–नाईक नगर गट ग्रामपंचायतीत सरपंचपदाच्या आरक्षणावरून राजकीय हालचालींना वेग


Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802


महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील सुधाकर नगर व नाईक नगर या दोन्ही वसाहती मिळून असलेल्या गट ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदाचे आरक्षण अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गासाठी राखीव झाल्याने स्थानिक राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आरक्षण जाहीर होताच काही नेतेमंडळींकडून विविध अर्ज-हरकती दाखल करून परिस्थिती बदलण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.
विशेष म्हणजे, गट ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या नाईक नगरमध्ये आदिवासी समाजाची सुमारे २४ घरे असून, संबंधित नागरिकांची नावे मतदार यादीत असल्याचे सांगण्यात येते. तसेच संबंधित आदिवासी नागरिकांकडे जात वैधता प्रमाणपत्रेही असल्याचा दावा करण्यात येत आहे.
त्यामुळे रोस्टरनुसार सरपंचपद एसटी प्रवर्गासाठी राखीव असल्याने नाईक नगरमधील पात्र आदिवासी उमेदवाराला सरपंचपदाची संधी मिळण्याचा मार्ग खुला असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दुसरीकडे, सुधाकर नगरमध्ये एसटी प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध नसल्याने तेथून सरपंचपदासाठी उमेदवारीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
ग्रामपंचायत ही केवळ सुधाकर नगरची नसून सुधाकर नगर आणि नाईक नगर मिळून गठित गट ग्रामपंचायत असल्याने आरक्षणाचा विचार संपूर्ण ग्रामपंचायत क्षेत्राच्या मतदारसंख्येच्या व कायदेशीर निकषांच्या आधारेच होणे अपेक्षित आहे. त्यामुळे नाईक नगरमधील आदिवासी समाजाला आरक्षणाच्या माध्यमातून मिळालेला प्रतिनिधित्वाचा घटनात्मक हक्क डावलण्याचा कोणताही प्रयत्न होऊ नये, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
दरम्यान, आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर काही राजकीय मंडळींच्या हालचाली वाढल्याने ‘आरक्षण लागू झाल्याने नेमके कोणाचे राजकीय गणित बिघडले?’ असा सवाल नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. विविध ठिकाणी अर्ज करून किंवा दिशाभूल करून आरक्षणाची प्रक्रिया प्रभावित करण्याचा प्रयत्न होत असल्यास प्रशासनाने त्याची निष्पक्ष चौकशी करावी, अशीही मागणी होत आहे.
आता संबंधित निवडणूक प्रशासन रोस्टर, मतदार यादी, आरक्षणाचे नियम आणि उमेदवाराची पात्रता या सर्व बाबींची कायदेशीर तपासणी करून अंतिम निर्णय काय घेते, याकडे सुधाकर नगर व नाईक नगर परिसराचे लक्ष लागले आहे.
आरक्षण हे कोणत्याही व्यक्तीचे राजकीय गणित साधण्यासाठी नसून, पात्र प्रवर्गाला घटनात्मक प्रतिनिधित्व मिळण्यासाठी आहे. त्यामुळे नाईक नगरमधील आदिवासी समाजाला त्यांच्या हक्काचे प्रतिनिधित्व मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button