पुसद अर्बन बँकेचे २ कोटी ३९ लाखांचे थकीत कर्ज प्रकरण लोकअदालतीत तडजोडीने निकाली

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
पुसद अर्बन बँकेचे २ कोटी ३९ लाखांचे थकीत कर्ज प्रकरण लोकअदालतीत तडजोडीने निकाली
राष्ट्रीय लोकअदालतीत पुसद अर्बन बँक व महावीर जिनिंग फॅक्टरी यांच्यात यशस्वी तडजोड
पुसद, दि. १२ : राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये पुसद अर्बन बँक लि. विरुद्ध महावीर जिनिंग फॅक्टरीचे मनोज झाम्बड यांच्यातील रु. २ कोटी ३९ लाख ९ हजार १५९ रुपयांच्या थकीत कर्ज प्रकरणाचा आपसी तडजोडीतून यशस्वीरीत्या निपटारा करण्यात आला.
सदर प्रकरण परक्राम्य अभिलेख कायद्याच्या (Negotiable Instruments Act) कलम १३८ अन्वये दाखल फौजदारी किरकोळ तक्रार अर्ज क्रमांक ७०/२०२५ होते. राष्ट्रीय लोकअदालतीत उभय पक्षांमध्ये सामोपचाराने तडजोड झाल्यानंतर हे प्रकरण निकाली काढण्यात आले.
या प्रकरणाच्या सुनावणीवेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक सेवकर, वसुली अधिकारी विलास जन्नावार, बँक कर्मचारी ॲड. आशिष ठाकरे तसेच बँकेचे पॅनल विधीज्ञ ॲड. योगेंद्र पाठक उपस्थित होते.
सदर लोकअदालतीचे कामकाज अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश श्रीमती एस. एन. शहा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. प्रकरणाचे कामकाज पॅनल प्रमुख तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी श्री. अर्जुन बी. जाधव तसेच ॲड. अभिषेक दीपकराव रुडे यांनी पाहिले.
यावेळी न्यायालयीन कर्मचारी भागवत मॅडम, तसेच शिपाई एस. व्ही. पाटील व यादवपल्ले उपस्थित होते.
राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून दोन्ही पक्षांनी सामोपचाराने तोडगा काढल्याने मोठ्या रकमेच्या या प्रकरणाचा न्यायालयीन वाद संपुष्टात आला.
Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802



