शहर
मुडाना येथे विजेच्या तारेमुळे भीषण आग; अविनाश शेळके यांचे घर जळून खाक

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
मुडाना — येथील अविनाश शेळके यांच्या घरावरून जाणाऱ्या विजेच्या तारेत शॉर्टसर्किट होऊन अचानक भीषण आग लागली. आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केल्याने संपूर्ण घर जळून खाक झाले.
आग लागल्याची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी तात्काळ धाव घेतली. तसेच पोलीस प्रशासनानेही घटनास्थळी दाखल होऊन आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र आगीचा वेग प्रचंड असल्याने सर्व प्रयत्न निष्फळ ठरले.
या आगीत घरातील संपूर्ण संसारोपयोगी साहित्य, धान्य व मौल्यवान वस्तू भस्मसात झाल्याने शेळके कुटुंब उघड्यावर आले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.



