“संस्कार पोदार लर्न स्कूल, उमरखेड येथे नवीन संकल्पना राबवून वार्षिक क्रीडा दिन उत्साहात संपन्न”

एस पी दळवी
उमरखेड (दि. १४ डिसेंबर २०२५) — संस्कार पोदार लर्न स्कूल, उमरखेड येथे आज रोजी वार्षिक क्रीडा दिन मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला. *”Jumbo in Strings and Sprints. Strings of Culture, Sprints of Energy” ही संकल्पना राबवून बाहुल्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती आणि उर्जेचा सुंदर संगम सादर केला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अजय क्षीरसागर तर संचालिका सौ. सोनाली क्षीरसागर या मुख्य अतिथींच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन पार पडले. प्राचार्य डॉ. भैरोबा मुंजाळ यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणातून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन खेळ व सांस्कृतिक मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले.

विद्यार्थ्यांनी विविध शर्यती, खेळ व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यासोबतच विद्यार्थ्यांचे पालकांच्याही घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये पालकांनी अतिशय उत्साहाने सहभाग नोंदवून आपल्या बालपणाच्या आठवणींना उजाळा मिळाला असे सांगून आनंद व्यक्त केला.खेळांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सहभाग नोंदविला.
या यशस्वी कार्यक्रमासाठी राजेश देशमुख, अजय क्षीरसागर, निशांत बयास, धीरज बगाडे यांचे मार्गदर्शनाखाली तसेच प्रा. भैरोबा मुंजाळ, प्रशासकीय अधिकारी दिघेवार आणि पोदार प्रेप प्रमुख भाग्यश्री मिटकरी, गायत्री बनसोड व गौरी देवसरकर यांचे सह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या परिश्रमाने वार्षिक क्रीडा दिन उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या शिस्तबद्ध आयोजनाबद्दल पालकांनी आयोजकांचे कौतुक केले.



