श्री शिवाजी विद्यालयात परिवहन समितीची सभा

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
उमरखेड:तालुक्यातील श्री शिवाजी शिक्षण संस्था पुसद संचलीत श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय पोफाळी येथे परिवहन समितीची सभा मुख्याध्यापक अवधुतराव देवसरकर यांच्या अध्यक्षतेखाली सरंपच रेखाताई सतोष क्षिरसागर, पर्यवेक्षक सुरेश सुरोशे, माणिकराव कांबळे यांच्या प्रमुख उपस्थीतीत पार पडली याप्रसंगी पिंपरी दिवट, अंबाळी, जणुना, गंगणमाळ, कळमूला येथील वाहन चालक उपस्थीत होते. सभेचे प्रास्ताविक परिवहन समितीचे सचिव प्रवीण सूर्यवंशी यांनी तर आभार दीपपूजा चव्हाण यांनी मांडले. या सभेला अध्यक्ष अवधूत देवसरकर यांनी वाहन चालकांना वाहतुकीचे नियम वाहन सुरक्षा संबंधी तथा ड्रायव्हिंग लायसन आधार कार्ड चारित्र्य प्रमाणपत्र, आसन क्षमतेक्षा जास्त विद्यार्थी वाहनात बसवु नये, वाहन चालकाचा परवाना इत्यादी बाबत मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना गावातून शाळेपर्यंत व शाळेतून गावापर्यंत सुरक्षित वाहतूक करताना कोणती काळजी घेतली पाहिजे या संदर्भात सविस्तर माहिती दिली या सर्व सूचनेचे पालन करण्याची ग्वाही वाहन चालकांनी दिली. सभेला परिवहन समितीचे सदस्य मिलीद शिंगणकर, सतोष भोपे, दिपपुजा चव्हाण, प्रकाश सुर्यवंशी, हजर होत



