Uncategorized

विद्यार्थ्यांशी थेट संवाद: मनविसेच्या ‘विद्यार्थी संवाद दौऱ्या’ला यवतमाळमधून सुरुवात..!

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून आज यवतमाळ शहरात ‘विद्यार्थी संवाद दौऱ्या’ चा शुभारंभ झाला. विद्यार्थ्यांच्या समस्या थेट समजून घेऊन त्या सोडवण्याच्या प्रामाणिक उद्देशाने या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या दौऱ्यात सर्वाधिक पटसंख्या असलेल्या शाळांना भेट देऊन, पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या शैक्षणिक आणि इतर अडचणी माझ्या सहकाऱ्यांनी जाणून घेतल्या. त्याचबरोबर, महाविद्यालयांना भेटी देऊन अकरावी, बारावी तसेच पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्यांवर चर्चा केली. तसेच, वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मूलभूत सोयीसुविधा आणि इतर अडचणींबद्दल माहिती घेतली.


या दौऱ्यादरम्यान, विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्यांची नोंद घेण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना या सर्व समस्या प्रशासनासमोर मांडून त्या सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे. मनविसे नेहमीच विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहीली आहे !
या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या समस्यांना वाचा फुटेल आणि त्यांना न्याय मिळेल, असा आम्हाला विश्वास आहे.

मनविसे विद्यार्थीसंवाददौरा यवतमाळ मनसेवृत्तांतअधिकृत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button