Uncategorized

महागाव तालुक्यात २१९ पांदन रस्ते अतिक्रमाच्या विळखळ्यात तहसीलदार प्रश्न मार्गी लावतील का?शेतकरी आंदोलन करायच्या तयारीत

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे

महागाव तालुक्यात पांदण रस्ते अभावी शेतकऱ्याचे अतोनात नुकसान होत आहे.महसूल मंत्री व जिल्हाधिकारी यांनी पांदन रस्ते चे प्रकरण लवकरात लवकर काढून शेतकऱ्यांना रस्ते मोकळे करून द्या असे सांगून सुद्धा महागाव येथील तहसीलदार अभय मस्के यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे .महागाव तालुक्यात २१९ पांदण रस्ते व अतिक्रमण असल्यामुळे शेतकऱ्यांना त्या पांदण रस्त्याचा कोणताही उपयोग होत नसल्यामुळे शेतामध्ये पावसाळ्यात बी बियाणे खते नेण्याकरता अडचण निर्माण झाली असताना शेतकऱ्यांनी शेती कशी करावी पांदन रस्त्या अभावी शेती करणे अवघड झाले आहे .तलाठी मंडळ अधिकारी यांनी याकडे जाणून-बुजून दुर्लक्ष केल्याचे चित्र महागाव तालुक्यात पाहायला मिळत आहे . शेताचे पांदण रस्ते मोकळे करून द्या म्हणून महागाव तालुक्यातील शेतकरी प्रशांत गावंडे शिवाजी देशमुख, यशोदा गायकवाड, अशोक तुम्हावर, मोहनराव करे, संतोष मोरे ,विजय गायकवाड ,नंदू मस्के यांनी लेखी निवेदन तहसीलदाराला देऊन पांदर रस्ते मोकळे करून द्यावे अशी मागणी केली आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button