फुलसांगी येथे 21 लाख रुपये रोकड व सोने घरपोडी करून चोरट्याने केला हात साप!

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
फुलसांगवी येथे अवैध धंद्याचे माहेरघर झाले आहे. घरफोडी दरोडे सारखे गंभीर गुन्हे वारंवार घडत असल्यामुळे सर्वसामान्य माणूस यांचे जगणे कठीण झाले आहे. मोठी बाजारपेठ चे ठिकाण असल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतमालाची खरेदी केल्या जाते त्यामुळे बाजारपेठ चे स्वरूप फुलसांगवी गावाला आलेले आहेत. गावामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अवैध धंदेवाले खुलेआम गांजा दारू मटका यांचा व्यवसाय करतात पोलीस प्रशासनाने यांच्यावर आजपर्यंत कारवाई न केल्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. फुल सांगी येथील भांडे व्यापारी ज्ञानेश्वर गणपत बोंढारकर हे आपल्या कुटुंबासह 31 जुलै रोजी राजस्थान देवदर्शन साठी गेले होते. ते आपला प्रवास आटोपून सहा ऑगस्टच्या रात्री अकरा वाजता घरी आले त्यांना आपल्या घराचे कुलूप तुटलेले दिसले त्यांनी घरामध्ये प्रवेश करून पाहिले असता 21 लाख 65 हजार रुपये रोख व सोने चोरी गेले असल्याचे निर्देशनास आले त्यांनी सकाळी 11 वाजता महागाव पोलीस स्टेशनला लेखी तक्रार दाखल केली. त्यानंतर घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमान गायकवाड व महागाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी अधिकारी व पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले .चोरांचा कुठे थांग पत्ता लागला नाही .त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हनुमान गायकवाड यांनी आज पर्यंत महागाव तालुक्यात अवैध धंदेवाल्यावर कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे परिसरात गांजा विक्री पत्त्याचे क्लब, मटका व अवैध दारूचा सुळसुळाट झाला आहे. या अगोदर फुलसांगवी येथे मोठमोठ्या घटना घडलेल्या आहेत. व्यापारी पेठ असल्यामुळे व्यापारी दहशत मध्ये राहत असल्याचे दिसत आहे. चोरांनी घर फोडी करून पोलिसांना चॅलेंज केल्याच दिसत आहे. महागाव पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास वेगवाने सुरू केल्याचे सांगण्यात आले .पण सुगाव कुठे लागलेला दिसत नाही.



