नगर विकास राज्यमंत्री व आमदाराच्या उपस्थित मंत्रालयामध्ये उंबरखेड महागाव मतदार संघासाठी न. प. च्या विकास कामासाठी चर्चा!

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
उंबरखेड महागाव ढाणकी नगर पंचायत व नगरपरिषद विविध विषयाच्या संदर्भात मुंबई येथे राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांच्या मंत्रालयामधील दालनामध्ये उंबरखेड महागाव मतदार संघाचे आमदार किशनराव वानखेडे यांच्या उपस्थितीत सर्व सचिव व अधिकारी यांची 6- 8 -2025 रोजी दुपारी 3 वाजता विविध विषयावर महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीस माजी आमदार विजयरावजी खडसे,आस्थापनाविषयक कार्यकारी अधिकारी जे. व्ही.जेवळीकर, नगर विकास विभागाचे उपसचिव श्री. समीर उन्हाळे,यांचे सह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत उमरखेड नगरपरिषदेतील दीर्घ काळापासून रिक्त असलेल्या पदांबाबत,प्रशासनावरील अतिरिक्त ताणाबाबत,उमरखेड शहर पाणी पुरवठा,महागाव शहर पाणी पुरवठा,ढाणकी शहर पाणीपुरवठा, नगरपरिषद रस्ते प्रकल्प, उमरखेड नगरपरिषद घनकचरा व्यवस्थापन,महागाव नगरपंचायत घनकचरा व्यवस्थापन,ढाणकी नगरपंचायत घनकचरा व्यवस्थापन,ढाणकी नगरपंचायत करीता नियमित मुख्याधिकारी मिळणे,महागाव नगरपंचायत करीता नियमित मुख्याधिकारी मिळणे या सर्व बाबीं बाबत सकारात्मक चर्चा झाली.असे मत आमदार किसन वानखडे यांनी आमच्या प्रतिनिधी जवळ मांडले.



