Uncategorized
माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू व्यक्तींना छत्रीचे वाटप

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव शहरांमध्ये माननीय
मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून सप्ताहामध्ये भारतीय जनता पार्टी महागाव शहर येथे आमदार किसनरावजी वानखेडे पुसद यवतमाळ जिल्ह्याचे समन्वयक नितीन भाऊ भुतडा यांच्या मार्गदर्शनात फुटपाथ विक्रेत्यांना पाऊस व उन्हापासून संरक्षण मिळण्यासाठी छत्रीचा वाटप कार्यक्रम करण्यात आला आहे .याप्रसंगी महागाव शहरातील नागरिक व महागाव शहर मंडळ अध्यक्ष निलेश नरवाडे शहर सरचिटणीस गजानन कदम सामाजिक कार्यकर्ते शंकरराव बावणे माझी शहर प्रमुख विलास शेबे माजी जिल्हा सुदामजी खंदारे गजानन पाटील नरवाडे संजय पाटे व सर्व बूथ प्रमुख शक्ती केंद्रप्रमुख इत्यादी लोक उपस्थित होते. त्याप्रसंगी छत्रीचे वाटप करून गोरगरीब लोकांना त्याचा फायदा झाला आहे.



