Uncategorized

डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत संस्कार पोदार लर्न स्कूलच्या विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी

एस पी दळवी


उमरखेड (२०२५) — संस्कार पोदार लर्न स्कूल, उमरखेड येथील विद्यार्थ्यांनी डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा २०२५ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत शाळेचे नाव उज्ज्वल केले.

या स्पर्धेसाठी एकूण ४६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला असून त्यापैकी ३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे अध्ययन राजूसिंग राठोड, अमन्यू विजयकुमार सूर्यवंशी व सिद्धी चंद्रकांत पाटील हे ३ विद्यार्थी प्रात्यक्षिक फेरीसाठी निवडले गेले आहेत, ही शाळेसाठी अत्यंत गौरवाची बाब आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल प्राचार्य डॉ. भैरोबा मुंजाळ यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत, भविष्यातही अशीच कामगिरी करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच अध्यक्ष श्री. राजेश देशमुख, उपाध्यक्ष प्रा. अजय क्षीरसागर, सचिव श्री. निशांत बयास, खजिनदार श्री. धीरज बगाडे, प्रशासकीय अधिकारी श्री. अतिश दिघेवार यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक करत अभिनंदन केले.

शाळेतील सर्व शिक्षकवृंदांचे सततचे सहकार्य व विद्यार्थ्यांची सांघिक एकजुटीने कार्य करण्याच्या वृत्तीमुळे ही यशोगाथा शक्य झाली असल्याचे मत व्यक्त करून विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय मार्गदर्शक शिक्षक वृंद व आई-वडिलांना देत असल्याचे प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button