कासोळा देव येथे श्री क्षेत्र महाकाली संस्थानात भव्य महाकाली मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न

कृष्णाशिळेतील दशभुजा महाकाली मातेची महाराष्ट्रातील प्रथमच स्थापना**
महागाव | प्रतिनिधी संजय नागरगोजे
दिनांक १५ डिसेंबर २०२५ रोजी महागाव तालुक्यातील कासोळा देव येथील श्री क्षेत्र महाकाली संस्थान येथे महाकाली मातेच्या भव्य मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा व मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा अत्यंत भक्तीभावात संपन्न झाला. या सोहळ्यास पालकमंत्री संजय राठोड व त्यांच्या सौभाग्यवती पत्नी यांच्यासमवेत उपस्थित राहून महाकाली मातेचे पूजा पाठ करू दर्शन घेण्यात आले.
विशेष बाब म्हणजे, महाराष्ट्रात प्रथमच कृष्णाशिला या पवित्र दगडापासून साकारलेली, दशभुजा, अभयमुद्रा व वरदहस्ताने विराजमान असलेली महाकाली मातेची भव्य व दिव्य मूर्ती आज विधिवत मंत्रोच्चारात प्राणप्रतिष्ठित करण्यात आली.
या पवित्र स्थळाला अनेक वेळा भेट पालकमंत्री व इंद्रनील नाईक यांनी वेळोवेळी दिल्या , या संपूर्ण परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी इंद्रजीत नाईक मंत्री महोदय व पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सुमारे अडीच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामध्ये रस्ते, सोयीसुविधा व पायाभूत विकासकामांचा समावेश आहे. या भागात रस्त्याबाबत काही अडचणी होत्या; संबंधित जमिनीवर वन विभागीय अडथळे असल्याने आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून सदर रस्ता मंजूर करून घेण्यात आला आहे.
कासोळा देव परिसरास माहूरगड, पोहरादेवी व संत सेवालाल महाराज यांसारख्या महत्त्वाच्या अध्यात्मिक व धार्मिक तीर्थक्षेत्रांची जवळीक असल्याने या संपूर्ण भागाला विशेष धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले आहे. तसेच हरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झालेली असून या भागाला ऐतिहासिक महत्त्वही लाभले आहे.
सदर प्राणप्रतिष्ठत सोहळ्यात परमपूज्य समर्थ सद्गुरु श्री गजानन माऊली धर्मगुरु बापूसिंग महाराज, महंत यशवंत महाराज, महंत रायसिंग महाराज, तसेच राज्यमंत्री इंद्रनील नाईक व जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते महाकाली मातेची मूर्ती स्थापना व पूजा विधी पार पडली.
या सोहळ्यास आमदार सईताई डाहाके, माजी आमदार नामदेव ससाने, माजी आमदार नजरधने यांच्यासह परिसरातील हजारो भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसर भक्तीमय वातावरणात सोहळा संपन्न झाला.



