Uncategorized

मूल होत नाही म्हणून महिलेची आत्महत्या नवरा सासू- सासरे यांच्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून केली आत्महत्या

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे

महागाव येथील मृतक सौ निशिगंधा सुशील कांबळे राहणार गोरोबा नगर वय 33 वर्षे तिचे लग्न 2008 मध्ये पडसा येथे सामूहिक विवाह बुद्ध विहार येथे झाला होता. तिला मूळ बाळ होत नाही म्हणून नवरा ,सासरा, सासू ,हे नेहमी त्रास देत होते ती वारंवार तिच्या भावाला सांगत होती तिच्या भावाने अनेकदा समजवण्याचा प्रयत्न केला परंतु ऐकायला कोणी तयार नव्हते दिनांक 23 -7 -25 पौर्णिमेच्या रोजी त्रासाला कंटाळून ती घरून निघून गेली ती घरी नाही अशी तिच्या नवऱ्याने सांगितले अखेर तीन दिवसांनी 26 -7 -2025 रोजी मृतक सो .निशिगंधा सुशील कांबळे यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केले . असा फोन आला महागाव शेत शिवारात विहिरीमध्ये तिची डेड बॉडी आढळून आली त्या घटनेची तक्रार तिचा भाऊ रामकृष्ण निवृत्ती भरणे रा. कलगाव ता. दिग्रस यांनी पोलीस स्टेशनमध्ये येऊन तक्रार दाखल केली त्या तक्रारीवरून तिचा नवरा सुशील पंडितराव कांबळे ,सासू शकुंतला पंडितराव कांबळे ,सासरा पंडितराव रुखमाजी कांबळे ,यांनी दिलेल्या मानसिक व शारीरिक त्रासामुळे माझी बहीण मृतक सो निशिगंधा सुशील कांबळे यांनी विहिरीत उडी मारून आत्महत्या केली तक्रारीवरून आ. क्र.426 /2025 कलम 108 , 3(5) BNS गुन्हा नोंद करून नवरा व सासरा आरोपींना अटक केली पुढील तपास पीएसआय देवानंद कायंदे हे करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button