Uncategorized

वि. दा. सावरकर इंग्रजी शाळेजवळील रस्त्यांची दुरवस्थाशाळेत जाण्यासाठी रस्ता द्या हो!!

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

उमरखेड शहरात हजारो कोटी रुपयांचे रस्त्याचे काम सुरू असताना नाथनगर लगत वि. दा. सावरकर इंग्रजी शाळेजवळील रस्त्याची बिकट अवस्था असून याच रस्त्याने येथील शहीद भगतसिंग शाळेत जाणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून चिमुकल्या विद्यार्थ्यांना दररोज चिखल आणि पाणी भरलेल भरलेल्या वाटेतून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रशासनाला शाळेत जाण्यासाठी रस्ता द्या हो असा टाहो फोडलारुडे नगर येथील शेकडो विद्यार्थी विद्यार्थिनी विदा सावरकर रस्त्याने दररोज शहीद भगतसिंग शाळेत पायी जातात हे अंतर एक किलोमीटरच्या आसपास आहे. या रस्त्याच्या आजूबाजूला पाणी साचल्याने व चिखल होत असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत ये जा करण्यासाठी नाहक त्रास होत आहे. या रस्त्यावर चालण्यासाठी विद्यार्थ्यांना धड रस्ताही नाही त्यामुळे पाठीवर दप्तर घेऊन हे विद्यार्थी दररोज ये -जा करीत असतात या चिमुकल्यांच्या समस्या कडे नगर प्रशासनाने तात्काळ दखल घेत सदर रस्ता त्वरित करण्याची मागणी परिसरातील पालकांकडून केली जात आहे. शहरातील रस्त्यांच्या समस्या संदर्भात विरोधी पक्षांनी आवाज उठवण्याची आवश्यकता आहे पण उमरखेड शहरात विरोधी पक्ष आहे की नाही ? हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे. आज रुडे नगर येथील शालेय विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी होत असलेले हाल पाहून नगर प्रशासन तातडीने लक्ष देईल का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत जुलैमध्ये झालेल्या पावसामुळे सदर परिसरातील रस्त्यांची अक्षरशः वाट लागली आहे . रस्त्यात पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे रस्त्यात जणू पाण्याचे तळेच साचले आहेत या रस्त्यावरून पायी चालणे दुचाकी चालविणे तर शक्यच होत नाही त्यामुळे आपल्या पाल्यांना या रस्त्यावरून नेतांना फार मोठे हाल होत आहेत.सदर रस्त्या संदर्भात परिसरातील नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनाकडे वारंवार निवेदन तक्रारी करूनही साचलेल्या पाण्यावर साधं मुरूमही प्रशासनाकडून टाकलं जात नाही ही लाजिरवाणी बाब आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button