Uncategorized
भिमराव चंद्रवंशी यांची बांधकाम उपसमितीवर प्रमुख पदी निवड

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
उमरखेड:- कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक तथा माजी जिप सदस्य भिमराव गोंविदराव पाटील चंद्रवंशी यांची बांधकाम उप समितीच्या प्रमुख पदी एकमताने निवड करण्यात आली. भिमराव पाटील यांनी तळागाळातील जनसेवा केली. श्री दतात्रेय प्रभु संस्थानचे उपाध्यक्ष आहेत. पोफाळी
जि.प.चे माजी सदस्य व अंबाळी गावाचे माजी सरपंच पद भुषविले. त्यांची निवड भाजप समन्वयक नितिन भुतडा, आ. किसनराव वानखेडे, माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर,सभापती कृष्णा पाटील देवसरकर विजय खडसे, डॉ विजय माने, नितिन माहेश्वरी, रमेशराव चव्हाण, माजी जि प अध्यक्ष व कुषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती श्रीपाल आडेव सर्व संचालक यांनी नियुक्ती केली आहे.



