Uncategorized

भाजपा नेते नितीन भुतडा यांची अधिकाऱ्यांसमवेत निर्माणाधिन विश्रामगृह वास्तुची पाहणी

अनावरणाला मुख्यमंत्रीसहित सा.बां. मंत्री येण्याची शक्यता !

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

उमरखेड:- लवकरच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण तथा स्थानिक निर्माणाधिन शासकीय विश्रामगृह वास्तुचे काम शेवटच्या टप्प्यात आलेले असताना भाजपा जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एम. एम . माथुरकर यांच्या समवेत आज 19 जुलै पाहणी केली. यावेळी त्यांनी उमरखेड व महागाव विधानसभा क्षेत्रातील रखडलेल्या तसेच प्रस्तावित विकास कामांबाबत चर्चा केली

उमरखेडच्या सुसज्ज अशा नवीन दुमजली शासकीय विश्रामगृहाचे काम अंतिम टप्प्यात आलेले असताना भाजपा जिल्हा समन्वयक नितीन भुतडा, कार्यकारी अभियंता एम. एम माथुरकर, उप अभियंता प्रमोद दुधे, क अभियंता वसंत खसावत, क अभि योगेश ढोले यांच्या समवेत सदर बांधकामाची पाहणी करून त्यांना योग्य त्या सूचना दिल्या याव्यतिरिक्त उत्तरवार उपजिल्हा रुग्णालयातील बांधकाम, ब्राह्मणगाव

ते चातारी कारखेड रस्त्याच्या कामाबाबत तसेच तालुक्यातील विविध विकास कामाबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. येत्या २ महिन्यात विश्रामगृहाचे सिविल वर्क पुर्ण करा काही दुरुस्त्या यावेळेस नितिन भुतडा यांनी संबंधीत कंत्राटदाराला कार्यकारी अभियंता यांचेसमोर विश्राम गृहाचे सौदर्याकरण हे महानगरपालिका धर्तीवर असणाऱ्या विश्रामगृहासारखे होईल अशा सुचना देवून जूने सा. बां. उपविभागाचे कार्यालय पाडून थेट विश्रामगृहाकडे सिमेंट रस्ता तयार होणार असल्याचे यावेळी भाजपा जिल्हा समन्वयक नितिन भुतडा यांनी यावेळी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button