Uncategorized

चातारी येथील जलजीवन योजनेच्या कामाची चौकशी करण्यात यावी.

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

उमरखेड:- प्रत्येक कुटुंबाला स्वच्छ पाणी मिळावे या उद्देशाने मोदी सरकारने जल जीवन मिशन ही योजना सुरू केली असून या योजनेद्वारे ग्रामीण भागात पाण्याची मोठे टाके, चांगल्या दर्जाची पाईपलाईन आणि प्रत्येक कुटुंबाला नळ देण्यात येणार असून सध्या ग्रामीण भागात या योजनेचा बट्ट्याबोळ झालेला पाहायला मिळत आहे. ठेकेदार यांच्या मनमानी कारभारामुळे शासनाने दिलेल्या निधीमध्ये प्रचंड भ्रष्टाचार होत आहे. या योजनेद्वारे करण्यात येणारे टाके हे निकृष्ट झालेले आहे त्यासोबतच अंदाजपत्रकानुसार विहिरीचे बांधकाम झालेले नाही. गावात खोदण्यात आलेल्या पाईपलाईनची खोली दीड दोन फुटावर पर्यंत आहे त्यामुळे जड वाहन केल्यास पाईपलाईन फुटू शकते आणि त्याकरिता वापरलेला पाईप हा चांगल्या दर्जाचा असणे आवश्यक आहे. पाण्याच्या टाक्याचे काम पूर्ण झाल्याशिवाय गावात पाईपलाईन करण्याचं गरज नव्हती. त्यामुळे संपूर्ण रस्ते खराब झाले आहेत. टाक्याचे काम झाल्यावर पाईपलाईन खोदायला हवी होती. तरी या सर्व कामाची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करण्यात येऊन काम चांगल्या दर्जाचे होण्याकरिता संबंधितावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते भागाजी शिवरतवाड यांनी केली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button