महागाव शहरात अतिक्रमण मुळे मंजूर कामाला खीळ?अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करून देण्यासाठी भाजपा कार्यकर्त्याच उपोषण

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव नगरपंचायत वार्ड क्रमांक 1मध्ये दत्तराव इंगळे यांच्या दुकानापासून ते कन्या शाळेपर्यंत माजी आमदार ससाने यांनी विशिष्ट पूर्ण योजनेमधून रोड मंजूर केला त्या कामावर निधी उपलब्ध करून दिला त्यावरून बांधकाम विभागाने निविदाद्वारे कामाचे मंजुरात ठेकेदारांना देण्यात आले परंतु नगरपंचायत यांनी अतिक्रमण काढण्यासाठी कोणते सहकार्य न केल्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली .ह्याच वार्डामधून भाजपचे कार्यकर्ते निवडून आले त्याच वार्डामध्ये विकासाच्या कामाला अतिक्रम अडथळा ठरल्यामुळे मागील एक

वर्षापासून निधी उपलब्ध असून सुद्धा ठेकेदाराला रोड करता आला नाही . अतिक्रमण काढण्यासाठी जनता पार्टीच्या कार्यकर्त्या छायाताई खंदारे यांनी आपल्या कुटुंबासह दिनांक 16 -7-2025 पासून तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे .अतिक्रमण निघेपर्यंत उपोषण सोडणार नाही असे पवित्रा उपोषणकर्त्यांनी घेतली आहे त्यावर प्रशासन कोणती भूमिका घेणार याची चर्चा सुरू झाली आहे.



