सातबारा कोरा यात्रेदरम्यान बच्चूभाऊ कडू सह बारा जनावर गुन्हे नोंद!

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
14 रोजी यवतमाळ जिल्ह्यातील आंबोडा गावी माजी मंत्री बच्चूभाऊ कडू यांनी शेतकरी कर्जमुक्ती साठी सातबारा कोरा व्हावा ही मागणी घेऊन राज्य महामार्ग 361 वर आंदोलन सभा घेतली. राष्ट्रीय महामार्गावर तीन तास वाहतूक खोळंबल्याने बच्चूभाऊ कडू यांचे सह अंबोड्यातील बारा शेतकऱ्यावर महागाव पोलिसात गुन्हे नोंद झाले आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त, प्रहार जनशक्ती पार्टीचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री बच्चुभाऊ कडू यांनी अमरावती जिल्ह्यातून सात जुलै रोजी काढलेली शेतकरी मुक्तीसाठी ‘सातबारा कोरा पदयात्रा’ शेवटच्या आणि आठव्या दिवशी यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यात अंबोडा या गावी गजानन महाराज संस्थान या ठिकाणी 14 जुलै रोजी दुपारी 2.30 वा. सभेचे आयोजन करण्यात केले होते. परंतु सात ते आठ हजारा एवढा जनसमुदाय जमा झाल्यामुळे वेळेवर राज्य महामार्ग 361 वर अंबोडा गावातील उड्डाण पुलावर शेतकरी कर्जमुक्तीची शेवटची समारोपीय सभा घेण्यात आली. सदर महामार्गावर 361 वर 30 ते 40 ट्रॅक्टर सह अनेक वाहनाचा ताफा खडका ते आंबोडा पर्यंत दोन्हीही बाजूने मोर्चेकऱ्यांच्या जमावाच्या गर्दीने खचाखच भरला होता. महामार्गावर अडीच ते साडेचारच्या दरम्यान दोन तास तास वाहतूक सेवा खोळंबली होती. अंबोडा गावी उड्डाण पुलावर घेण्यात आलेल्या प्रचंड विराट सभा घेण्यासाठी आयोजकांनी या ठिकाणची परवानगी घेतली नव्हती. आयोजकांनी बेकायदेशीर जमाव जमवून नियोजित ठिकाणी सभा न घेता महामार्ग क्र. 361 उड्डाण पुलावर 30 ते 40 ट्रॅक्टर आडवे करून सात ते आठ हजार शेतकऱ्यांची समारोपीय मोर्चाची सभा महामार्गाच्या मध्ये घेण्यात आल्यामुळे जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे प्रतिबंधक आदेशाचे उल्लंघन झाल्याने बच्चुभाऊ कडू रा. अचलपूर जि. अमरावती यांचे सह महागाव तालुक्यातील आंबोडा गावचे गणेश दादाराव ठाकरे, आकाश भाऊराव पावडे, रामेश्वर विठ्ठल कदम, सचिन प्रकाश राऊत, बंडू लहुजी वाघमारे, सुनील देविदास पावडे, सदानंद राऊत, पप्पू विश्वनाथ करपे, शेख रियाज, योगेश तायडे, शुभम खेडे या आरोपीवर पोलीस उपनिरीक्षक देवानंद कायंदे यांच्या फिर्यादीवरून जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांचे प्रतिबंधक आदेशाचे उल्लंघन केल्याने कलम 126 (2), 189( 2), 223 भारतीय न्याय संहिते कलम 135 नुसार महाराष्ट्र पोलीस अधिनियमा अन्वये महागाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनराज निळे यांच्या मार्गदर्शनात कार्यवाही करण्यात आली असून पुढील तपास एपीआय अंबुरे हे करीत असल्याची पोलीस सूत्राकडून माहिती मिळाली.
(बॉक्स)
बच्चू कडूसह बारा जनावर महागाव पोलिसांत गुन्हे नोंद!
यवतमाळ जिल्ह्यातील महागाव पोलीस ठाण्यात बच्चू कडूसह बारा जनावर गुन्हे दाखल करण्यात आले. कडू यांच्या पदयात्रेची समारोपीय सभा श्री. गजानन महाराज मंदिर आंबोडा परिसरात नियोजित केली होती. ऐनवेळी आयोजकांनी व बच्चू कडू यांनी समारोपीय सभा आंबोडा राज्य महामार्ग 361 वरील उड्डाण पुलावर आयोजित केली. दरम्यान ट्रॅक्टर महामार्गावर आडवे लावून वाहतूक पूर्णपणे बंद केली होती.या ठिकाणी समारोपीय सभा घेतल्याने तब्बल तीन तास दोन्ही बाजूंनी वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे माजी मंत्री बच्चू कडू सह 12 शेतकऱ्यावर महागाव पोलीसांत महामार्ग रोखून धरल्या प्रकरणी गुन्हा नोंद दाखल झाला आहे.



