Uncategorized

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

उमरखेड:-  संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर दि 13 जुलै रोजी अक्कलकोट येथे विकृत मनोवृत्तीच्या लोकांकडून शाई फेक करण्यात आली .त्याचा उमरखेड संभाजी ब्रिगेडच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन निषेध करण्यात आला आहे .
     शिव फुले शाहू आंबेडकर यांचा विचार समाजात रुजविण्यासाठी आणि बहुजन समाजात अनेक उद्योगपती घडविण्यासाठी प्रवीण गायकवाड यांचे योगदान आहे .त्यांनी आपल्या कार्यातून अनेकांची नेहमी पोलखोल होत असते त्यामुळे चिडलेल्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी त्यांच्यावर शाई फेक करून भ्याड हल्ला केला त्याचा उमरखेड तालुका संभाजी ब्रिगेडच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन निषेध करण्यात आला .यावेळी गुणवंत सूर्यवंशी ,प्राचार्य वि.ना. कदम चक्रधर पाटील देवसरकर ,देवानंद मोरे ,एड शिवाजीराव वानखेडे,सुरेश कदम ,राम कदम ,शिवाजी माने,विठ्ठल हनवते ,बालाजी वानखेडे गजानन चव्हाण आदींनी उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे यांना निवेदन देऊन  निषेध नोंदविला आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button