विजेच्या लपंडावामुळे नागरिक हैराण ! बेजार ! त्रस्त !

[मेंटनच्या कामात सावळा गोंधळ ग्रामीण भागातील सर्वत्र पोल वाकलेले तार लोंबलेले अशी अवस्था रोहितत्राची औदशा वेळोवेळी वीज खंडित वादळ वाऱ्याच्या नावावर चालतो खेळखंडोबा ]
सहसंपादक शेख मुजाहिद मो 7798306192
उमरखेड :तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात विज वितरण कंपनीचा मनमानी कारभारमुळे दिवसेन दिवस वाढत चाललेल्या विजेचा खेळ खंडोबा मुळे नागरीक हैराण ! बेजार ! त्रस्त झाले असून मेन्टनसच्या थातूर मातूर कामामुळे पोल वाकलेले, तार लोबंकाळलेले, रोहित्राची मेंटनस अभावी औदशा अशी अवस्था असल्यामुळे वारंवार वीज खंडित होत असून हया बाबीला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित झाला असून अधिकारी मात्र उंटावरून शेळ्या करण्याचे कार्य करीत असल्याचा प्रकार उघडकीस आला असून जनसामान्य जनतेत चर्चेला उदान आले आहे. प्रस्तावित माहितीनुसार असे निदर्शनास आले की, लायसन एकाची आणि कामे करणारे टक्केवारी देऊन दुसरेच डम्मी ठेकेदार थातुर मातुर कामे करीत असल्या बाबतची माहीती मिळाली असून सबस्टेशन वरील अभियंत्रीकी उंटावरून शेळ्या हाकण्याचे काम करित असुन तालुक्यात ज्या ठिकानी कामे चालु असलेल्या ठिकानी ढुंकूनही पाहत नाही ” दिन ज्याव पैसा आव ” अशी परिस्थिती झाली असुन ग्रामीण भागातील सर्वत्र रोहीत्रे मेंटनस अभावी पोल वाकलेले तार लोबंकाळलेले अशी परिस्थीती असुन सर्व ग्रामीण भागातील नागरीकांच्या माथ्यावर मनस्ताप असल्याचा प्रकार आज मितीला दिसुन येत आहे. महागाव तालुक्यातील गुंज सबस्टेशन च्या कारभारामुळे जनता हैरान ! बेजार ! परेशान !झाली असून या बाबीकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल देऊन त्याचे निराकारन करून जनतेस न्याय द्यावा अशी मागणी सर्वसामान्य जनतेत होत आहे.



