बाळदी ते गावंडे कॉलेज रस्त्यावरील झाड देत आहे अपघाताला निमंत्रण

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
उमरखेड :- उमरखेड पासून पाच किलोमीटर अंतरावर असलेले बाळदी हे गाव. मागील काही दिवसापूर्वी मुसळधार व वादळी वाऱ्यासहित पाऊस झाला होता.त्याच पावसात एक झाड रस्त्याला भिडून पडले आहे त्याचा त्रास बाळदी पिरंजी कृष्णापुर या गावातील प्रवाशांना करावा लागत आहे.तसेच काही ठिकाणी रस्त्यालगत वाढलेल्या व रस्त्यावर झुकलेल्या झुडपांचा येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण करत आहे. याच रस्त्याने गावातील व शेजारील गावातील विद्यार्थी सायकलने,मोटरसायकलने तसेच चार चाकी वाहनाने तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी रोज प्रवास करत असतात.एकेरी रस्ता व रस्त्याच्या बाजूची झुडुपे यामुळे वाहन चालकाला गाडी खाली घेणे अवघड जात आहे.त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण होत आहे. गेल्या महिन्यात तीन अपघात देखील झालेले आहेत. असे अपघात होऊ नये म्हणून प्रशासनाने दखल घेऊन रस्ते विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर आलेल्या झाडाची व झुडपाची तोड करावी असे मागणी बाळदी येथील स्थानिकासहित प्रवासी करत आहेत.



