सातबारा कोरा पदयात्रेचा झाला अंबोडा येथे समारोप! ” पदयात्रे रोहित पाटलांची सहभागी “

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
दहा ते बारा हजार शेतकऱ्यांच्या सहभागामुळे अखेर सभा तुळजापूर नागपूर रोडवर ट्रॅक्टर मधून सभेला माजी मंत्री बच्चुभाऊ कडू यांनी संबोधन केले!
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होण्याच्या दृष्टीने माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात निघालेली पदयात्रा सोमवारी दुपारी 2 वाजता दरम्यान महागाव तालुक्यातील संत गजानन महाराज संस्थान अंबोडा येथे पोहचला होता. सात दिवसापासून निघालेल्या या पायी दिंडी यात्रेचा समारोप कार्यक्रम पार पडला.
या यात्रेमध्ये आमदार रोहित पाटील उपस्थित राहून शेतकरी यात्रेला संबोधित केले. 7 जुलै ते 14 जुलै दरम्यान सात
दिवसात अनेक शेतकऱ्यांना सोबत घेऊन125 किलोमीटरचा पायदळ पायी प्रवास करीत भेटी गाठी देत
माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात अमरावती जिल्ह्यातून पदयात्रा निघाली आहे. शेतकऱ्यांचा सातबारा उतारा व्हावा ही मागणी घेऊन सभेला जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी शेतकरी ट्रॅक्टर व इतर
वाहने घेऊन उपस्थिती लावली होती. यावेळी नागपूर-बोरी तुळजापूर या नॅशनल हायवे रस्त्यावर काही काळ सभेमुळे शेतकऱ्यांच्या गर्दीने रस्ता जाम झाला होता. निवडणुकीच्या अगोदर महायुती सरकारने शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफी करण्याचे आश्वासन देऊन शेतकऱ्यांची मते आपल्या पदरात पाडून घेतली. परंतु निवडणुकीनंतर
सत्ता मिळताच शब्दाचा खेळ करून सरकारने कर्जमाफीचे आश्वासन पुढे ढकलले. शेतकऱ्यांचा आवाज बनुन पापळ ते चिलगव्हाण सातबारा कोरा पदयात्रा काढण्यात आली. चिलगव्हा येथे विदर्भातील पहिली शेतकरी आत्महत्या झालेल्या साहेबराव पाटील करपे व त्यांच्या परिवारातील सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिवाजीराव देशमुख, अमृतराव देशमुख, माजी सभापती दीपक आडे, संजय पाटे, विजय सूर्यवंशी , दत्तराव कदम, डॉ. संदीप शिंदे, नारायण पतंगराव, हनवंतर देशमुख, प्रवीण ठाकरे, तात्या शिन्दे, संदीप ठाकरे, अमोल आवटे यांच्यास विविध पक्ष, सामाजिक संघटनां तालुक्यातील शेतकरी हजारोच्या संख्येने उपस्थित होते.
(बॉक्स)
शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी पापळ ते चिलगव्हाण असा 138 किलोमीटरचा पायी प्रवास करीत “सातबारा कोरा करा पदयात्रा” काढली आहे, आज शेवटचा आठवा दिवस असून या यात्रेत हजारो शेतकऱ्यांनी हजेरी लावून पदयात्रेत सहभाग नोंदविला. महाराष्ट्रातील पहिली आत्महत्या ज्या गावात झाली त्या करपे कुटुंबीयांची बच्चू कडूंनी भेट घेतली. यानंतर अंबोडा येथील जाहीर सभेला शरद पवार गटाचे आमदार रोहित पाटील यांनीही याप्रसंगी सभेला संबोधित केले. 19 मार्च 1986 ला साहेबराव करपे यांनी सहकुटुंब आत्महत्या झाली होती, ती महाराष्ट्रातली पहिली शेतकरी आत्महत्या होती. अंबोडा येथे विराट सभेला महाराष्ट्रातून हजारोच्या संख्येने शेतकरी जमा झाले होते. जोपर्यंत शेतकऱ्याचा सातबारा कोरा होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार आहे.
आमदार बच्चूभाऊ कडू,
संस्थापक अध्यक्ष, प्रहार संघटना



