Uncategorized

अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष लाखोंच्या उलाढालीचे गंगाजळ,/ उमरखेड शहरासह तालुक्यात गुटखा विक्री अनियंत्रीत

मुख्य संपादक

उमरखेड : मराठवाड्यातून राजरोसपणे अवैध गुटख्याची वाहनाद्वारे आयात करून, शहरासह ग्रामीण भागात जीवघेण्या गुटखा व सुंगधित तंबाखुची खुलेआम विक्री सुरू आहे. या अवैध धंद्यात दररोज लाखोंची उलाढाल होत असल्याचे पहावयास मिळते. यात आनेकांचे हात ओले होत असल्याची चर्चा होत आहे. कार्यवाहीची जबाबदारी असणारा अन्न व औषध प्रशासनासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
गुटख्यातील घातक घटकांमुळे कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा सामना करावा लागतो. तंबाखुजन्य पदार्थांमुळे नागरिकाचे आरोग्य बिघडू नये यासाठी राज्य सरकारने २०१२ मध्ये गुटख्यासह तंबाखूजन्य सुपारी, पान मसाला या पदार्थांची निर्मिती आणि विक्री करण्यास बंदी घातली आहे. मात्र या गुटखा विक्रीने संबंधीत विभागासमोर मोठे आव्हान उभे झाले आहे. परिणामी संबंधित विभागाने कायम स्वरूपी गुटखा बंदी करण्यास ठोस उपाय योजना करून, तस्करांच्या मुसक्या आवळण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

अवैध गुटखा विक्रीमुळे शालेय विद्यार्थी हे सुद्धा व्यसनाधीन होत आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने अवैध गुटखा विक्रेत्यावर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

            चौकट 

चारचाकी व दुचाकीच्या माध्यमातून गुटख्याची आयात

तालुक्यातील उमरखेड शहरासह ढाणकी, बिटरगाव, पोफाळी, मुळावा, दराटी भागात, मराठवाड्यातील हिमायतनगर येथुन चारचाकी व दुचाकीच्या माध्यमातून गुटख्याची आयात केली जात असल्याचे बोलल्या जात आहे. बाहेरून आलेला गुटखा शहरासह ग्रामीण भागात पोहोचविणारे मोठे रॅकेट कार्यरत असलल्याची चर्चा आहे. तालुक्यातील शहरासह ग्रामीण भागातील सर्वच किराणा दुकान व पानटपरीधारकांच्या दुकानांसमोर गुटखा तस्कर मोटारसायकल उभी करून खुलेआम गुटखा व सुगंधित तंबाखू पोहोचविण्यात येतो. राजरोजपणे गुटखा विक्री केला जात असल्याचे चित्र असतांनाही याकडे अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button