दिव्यांगांच्या प्रश्नांवर जिल्हाधिकाऱ्यांवर बच्चू कडू संतापले

कायद्याने काम करायचे
नसेल तर आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल : बच्चु कडु
शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
उमरखेड : ७ तारखे पासून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा व्हावा या मागणीसाठी डॉ. पंजाबराव देशमुख भारताचे पहिले कृषिमंत्री यांच्या जन्मगावा पासून सुरु होणाऱ्या सातबारा कोरा यात्रेच्या आढावा बैठकीसाठी बच्चू कडू हे महागाव तालुक्यातील आंबोडा या ठिकाणी आले.
प्रहार उमरखेड शहर प्रमुख राहुल मोहितवार यांनी दिव्यांगांच्या प्रश्नांची आठवण करून दिली असता त्या ठिकाणाहून जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावत उमरखेडचा दिव्यांगांचा प्रश्न मार्गी न लावल्यामुळे बच्चू कडू हे जिल्हाधिकाऱ्यांवर संतापले. नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश जामनोर हे दिव्यांग बांधवांचा पाच टक्के निधी हा आस्थापना खर्च करून चुकीच्या पद्धतीने वाटप करत आहे. त्या संदर्भात जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना फोन द्वारे बच्चू कडू यांनी खडे बोल सुनावले. शासन निर्णया प्रमाणे दिव्यांगांचा पाच टक्के
निधी हा उत्पन्नाच्या पाच टक्के खर्च व्हायला पाहिजे परंतु उमरखेडचे मुख्याधिकारी हे आस्थापना खर्च करून चुकीच्या पद्धतीने वर्ग करत असल्याने बच्चू कडू यांचा जिल्हाधिकाऱ्यांना झापले. दिव्यांग बांधवांना आपला हक्काचा निधी मिळावा यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष मार्फत गेल्या चार वर्षांपासून विविध आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधत आहे. परंतु जाणून तुजाणून बुजून प्रशासन हे दिव्यांग बांधवांच्या प्रश्नांकडे वारंवार दुर्लक्ष करत असल्याने बच्चू कडू हे दिव्यांग प्रश्नासाठी आक्रमक होत तात्काळ दिव्यांगांचा येत्या १४ तारखे पर्यंत मार्गी लावावा अन्यथा संघर्ष अटळ आहे. असा इशारा सुद्धा यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना बच्चू कडू यांनी दिला. त्यामुळे आता जिल्हाधिकारी हे कोणता निर्णय घेतो या कडे सर्व दिव्यांग बांधवांची लक्ष लागून आहे.
चौकट
अनेक आंदोलनातून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न
दिव्यांग बांधवांचा निधी हा दिव्यांग धोरण २०१८ नुसार उत्पन्नाच्या पाच टक्के मिळावा या मागणीसाठी आजपर्यंत प्रहार जनशक्ती पक्ष व दिव्यांग क्रांती आंदोलनाच्या माध्यमातून भीक मागो आंदोलन, आत्मदहन आंदोलन, घेराव आंदोलन, ठिया आंदोलन, डफडी बजाव आंदोलन, लोटांगण आंदोलन या सारखे अनेक लक्षवेधी आंदोलने करत शासनाला नाहक हाक देण्याचा प्रयत्न करण्यात आला.



