शासनाच्या योजनेची माहिती तसेच सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी शिवसेना कटिबद्ध – जिल्हा प्रमुख यशवंत पवार

( शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन )
शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
उमरखेड : शासनाच्या विविध लोकोपयोगी योजना सर्वसामान्य जनते पर्यंत पोहचल्या पाहिजेत व जनतेला भेडसावणाऱ्या विविध समस्यांचे निराकरण करून त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी या कार्यालयातून सर्वतोपरी प्रयत्न होणार असल्याचे यवतमाळ शिवसेना जिल्हा प्रमुख यशवंत पवार यांनी सांगितले . ते पुसदरोड वरील शिवसेना जनसंपर्क कार्याल्याच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानावरून ७ जुलै रोजी बोलत होते . शिवसेनेचे मुख्यनेते ,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व नामदार तथा पालकमंत्री संजय राठोड यांच्या मार्गदर्शनात कार्यालयाचे कामकाज चालणार आहे त्यामुळे शेतकरी , शेतमजुर , लाडक्या बहिणी , लाडके भाऊ , निराधार , दिव्यागांच्या समस्या कार्यालयात निवेदनाद्वारे द्याव्यात त्या सोडवून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न होणार असल्याचे पवार यांनी सांगितले . शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख श्रीधर मोहोड यांनी केले . शहर व परिसरातील नागरीकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या सोडविण्यासाठी , तसेच गोरगरीब जनतेवर अन्याय होत असेल तर न डगमगता कार्यालयाशी संपर्क साधावा , आपणास न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिल असे याप्रसंगी श्रीधर मोहोड म्हणाले .

याप्रसंगी महिला जिल्हा प्रमुख वैशाली मासाळ , उमरखेड महिला तालुका प्रमुख आशा कलाणे , उमरखेड शहर प्रमुख ॲड . संजिवकुमार जाधव , माजी उपजिल्हाप्रमुख कैलास कदम यांनी मनोगत व्यक्त केले . नागरीकांना सोयीचे व्हावे या उद्देशाने शहरात कार्यालय असावे अशी कल्पना मा .उपजिल्हाप्रमुख कैलास कदम यांनी व्यक्त करून सुसज्ज असे कार्यालयाची कल्पना पुर्णत्वास नेल्यामुळे जिल्हा पदाधिकाऱ्यांनी कदम यांचा सत्कार केला . या प्रसंगी शहर संघटक अमोल सुर्यवंशी , उपशहर प्रमुख नितिन कलाणे , सुभाष बाभुळकर , ॲड . अजय पाईकराव , बसवेश्वर क्षिरसागर , सुनिल शहाणे , दामोदर इंगोले , गणेश चंद्रवशी , अर्जून बरडे , विनायक पोहरकर , सचिन दवणे , महिला शिवसेना शहर उपप्रमुख सारिका कोकांडे , ज्योती दवणे आदि पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यालय प्रमुख राजु गायकवाड यानी केले तर आभार महिला शहर संघटिका संगिता धाबे यांनी मानले .
जवाहर वार्ड व सिध्देश्वर वार्ड येथे शाखेचे उद्घाटन करण्यात आले
चौकट
अनेकांनी घेतला शिवसेनेत प्रवेश !
शिवसेनेचे मुख्यनेते , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व नामदार , पालकमंत्री संजय राठोड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत ,
जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पळशीचे माजी सैनिक विठ्ठल गोरे , टाकळीचे माजी सरपंच कृष्णा पाटील कदम , ढाणकीचे बिजेपी पदाधिकारी प्रशांत पंडितकर , दिवटपिंप्रीचे बाळासाहेब ढोबळे , पार्वती खंदारे , रंजना आढागळे , गंगाबाई शिर्के , अस्मिता पाईकराव , अभिषेक जाधव , राठोड , दुर्गेश उन्हाळे , दत्तराव देशमाने सह अनेकांनी शिवसेनेत प्रवेश घेतला .



