Uncategorized

दोन वर्षांपासूनच्या जनावरे चोरी प्रकरणांना अखेर दिशा; प्रभारी ठाणेदार अंबुरे यांच्या कारवाईत चार आरोपी जेरबंद


महागाव | प्रतिनिधी संजय नागरगोजे
तालुक्यातील दगडथर परिसरात जनावरे चोरी करणाऱ्या टोळीचा महागाव पोलिसांनी पर्दाफाश करत चार आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेले वाहन जप्त करण्यात आले असून MH 23 B N 2975 हे वाहन जप्त करून कारवाईमुळे परिसरातील पशुपालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महागाव पोलीस स्टेशन हद्दीतील गुंज, मोहदी, हिवरा, दगडथर तसेच आसपासच्या गावांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून जनावरे , बकऱ्या, तार,चोरीच्या घटना सातत्याने घडत होत्या. या संदर्भात अनेक गुन्हे दाखल झाले होते. मात्र, विविध तपासांनंतरही आरोपींचा ठोस मार्ग काढण्यात यश आले नव्हते. त्यामुळे पशुपालक आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, प्रभारी ठाणेदार अंबुरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जनावरे , तार, बकरी,चोरीच्या घटनांकडे गांभीर्याने लक्ष देत विशेष मोहीम हाती घेतली. ग्रामस्थांच्या सहकार्याने संशयितांवर लक्ष ठेवण्यात आले. शनिवारी मध्यरात्री दाडघर परिसरात संशयास्पद हालचाली दिसून आल्याने नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली.
माहिती मिळताच महागाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कारवाई केली आणि चार आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेले वाहन जप्त करण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम ३४९/२६ कलम 303 (२)६२,३(५)B N S नुसार गुन्हे दाखल केले
प्राथमिक चौकशीत या टोळीचा परिसरातील पूर्वीच्या जनावरे चोरीच्या घटनांशी संबंध असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अटकेतील आरोपींकडून आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता असून पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे.
या कारवाईमुळे गेल्या दोन वर्षांपासून जनावरे चोरीमुळे त्रस्त असलेल्या शेतकरी व पशुपालकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांनी महागाव पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक केले असून भविष्यातही अशा गुन्ह्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दोन वर्षांपासूनचा प्रश्न ऐरणीवर
महागाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये जनावरे चोरीच्या घटना वारंवार घडत असताना आरोपींपर्यंत पोहोचण्यात यश येत नव्हते. त्यामुळे पूर्वीच्या तपास प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. मात्र, प्रभारी ठाणेदार अंबुरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या ताज्या कारवाईमुळे या प्रकरणांना नवी दिशा मिळाली असून जुन्या तार चोरीचे प्रकरण गुन्ह्यांचाही छडा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.वाहन चोरीचे आहे का तपासने गरजेचे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button