Uncategorized

आदर्श शेतकरी विनोदराव रंगराव मैद यांना मानाचा मुजरा!


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यात उटी गावातील प्रगतशील व आदर्श शेतकरी विनोदराव रंगराव मैद यांना महाराष्ट्र शासनाचा सन २०२३ चा प्रतिष्ठेचा “कृषीनिष्ठ पुरस्कार” प्राप्त झाल्याबद्दल कृषी विभाग, महागाव यांच्या वतीने त्यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
स्वतःच्या अथक परिश्रम, जिद्द आणि शेतीतील विविध प्रयोग व संशोधनाच्या बळावर त्यांनी शेती उत्पादन वाढविण्याचा आदर्श निर्माण केला आहे. गड्यासारखी मेहनत घेऊन आधुनिक तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण पद्धती आणि शास्त्रीय दृष्टिकोनाचा अवलंब करत त्यांनी शेतीत उल्लेखनीय यश संपादन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे परिसरातील अनेक शेतकरी आधुनिक शेतीकडे वळले असून उत्पादनवाढीसह आर्थिक प्रगती साधत आहेत.
त्यांच्या कार्यामुळे महागाव परिसरातील शेतकरी वर्गाला नवी दिशा मिळाली असून कृषी क्षेत्रात त्यांनी उभा केलेला आदर्श प्रेरणादायी आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
मा. विनोदराव रंगराव मैद यांना कृषीनिष्ठ पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! त्यांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना मिळो आणि शेती क्षेत्रात ते असेच नवे आदर्श निर्माण करत राहोत, हीच सदिच्छा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button