शहर

वार्ड क्र. ११ मध्ये पाण्याची कायमस्वरूपी सोय; संभाजी नरवाडेंच्या प्रयत्नांना यश


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव नगरपंचायत अंतर्गत वार्ड क्रमांक ११ मधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अखेर कायमस्वरूपी मार्गी लागला आहे. श्री. संभाजी नरवाडे यांच्या पुढाकारातून व अथक प्रयत्नातून बोअरवेलचे काम यशस्वीरीत्या पूर्ण झाले असून या बोअरला मुबलक पाणी लागले आहे. आज या ठिकाणी इलेक्ट्रिक मोटार पंप बसविण्यात आला आहे.
या उपक्रमामुळे वार्ड क्रमांक ११ मधील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून विशेषतः महिलांची दैनंदिन पाण्यासाठीची गैरसोय दूर झाली आहे. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली पाण्याची समस्या सुटल्याने परिसरात समाधानाचे वातावरण आहे.
कोणताही वैयक्तिक स्वार्थ न ठेवता लोकहितासाठी केलेल्या या कार्याबद्दल संभाजी नरवाडे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. यापूर्वीही त्यांनी प्रभाग क्रमांक १२ मधील वाड्यावस्त्यांवर पाण्याची व्यवस्था करून दिली होती. या स्तुत्य कार्याबद्दल प्रभागातील नागरिक व महिलांनी एकमुखाने त्यांचे आभार मानले आहेत. तसेच त्यांनी ३०वर्षांपूर्वी आमनी येथे जाण्याकरता स्वतःच्या शेतात रस्ता दान करून लोकांना रस्ता उपलब्ध करून दिला. आजही परिसरातील त्यांचे नाव घेतात. युवा पिढीला काही गोष्टी माहित नाही
लोकांच्या मूलभूत गरजांसाठी पुढाकार घेऊन प्रत्यक्ष कृतीतून प्रश्न सोडविण्याची भूमिका संभाजी नरवाडे घेत असल्याने ते परिसरात कौतुकाचा विषय ठरत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button